Advertisement

Responsive Advertisement

ठाकरे’ सरकारची ही दुटप्पी भूमिका; गरीबांना त्यांची घरे मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू - संजय केनेकर

औरंगाबाद : सरकारने ज्या जिल्ह्यात लेबर कॉलनी वसवली होती त्या त्या ठिकाणी येथील रहिवासी कामगार, कर्मचाऱ्यांना ते घर त्यांच्या नावावर करून देण्यात आले होते. सरकार इतर जिल्ह्यातील लेबर कॉलनी बाबत वेगळा न्याय आणि औरंगाबाद मधील लेबर कॉलनी विषयी वेगळा न्याय देत आहे. ठाकरे सरकारच्या या दुटप्पी भूमिकेमुळे लेबर कॉलनीतील या मूळ रहिवाशांवर अन्याय होत आहे. वेळ पडल्यास गरिबांना त्यांची घरे मिळवून देण्यासाठी मी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा इशारा देत भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर तडकाफडकी जिल्हाधिकाऱ्यांच्या सभेतून उठून गेले.गुरुवारी (दि.४) लेबर कॉलनीतील घरे पाडण्याच्या भूमिकेतून जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी या मोहिमेत असणाऱ्या सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासह या मोहिमेतील सर्व अधिकारी रहिवाशांची घरे पाडण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी या भूमिकेला कडाडून विरोध केला. यावेळी ते म्हणाले, लेबर कॉलनी ही १९५२-५३ मध्ये वसली आहे. हे सर्व कामगार, कर्मचारी सरकारच्या कार्यालयातील अधिकृत कर्मचारी आहेत.एकीकडे केंद्र सरकार बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजना राबवत आहे तसेच राज्य सरकार मुख्यमंत्री आवास योजना राबवत आहे. दोन्ही सरकार एकीकडे बेघरांना घर देण्याचा निर्णय घेत आहेत. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी घर असलेल्या लोकांना बेघर करत आहे. धोकादायक इमारती पाडण्याच्या कायद्यानुसार या लोकांना बेघर करण्याचे षड्यंत्र जिल्हाधिकारी करत आहेत. यातून ही २२ एकर जागा स्मार्ट सिटी म्हणून विस्तारित करणे हेतू आहे.यात मोठ्या प्रमाणावर नेतेमंडळी प्रशासनाच्या माध्यमातून आपला उद्देश सफल करू पाहत आहे. या विस्ताराची मोठी उलाढाल किती गरिबांची घरे मातीत काढणार का ? हा रोष मी भाजपकडून माझ्या भूमिकेतून व्यक्त केला. गरिबांनी घरे दिल्याशिवाय सद्यस्थितीतील घरे पाडू देणार नाही. त्याकरिता पालकमंत्री, महसूलमंत्री त्यांच्याबरोबर बैठका घेऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करेल. या बैठकीत कोणताही पर्याय तोडगा अजून निघालेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या