Advertisement

Responsive Advertisement

जिल्यात गोदावरी पात्रावर रेती माफियांचा कब्जा,बेसुमार वाळू उपसा सुरू महसूल प्रशासन झोपेत


मराठा तेज  नांदेड प्रतिनिधी.

नांदेड :जिल्ह्याची संजीवनी असलेल्या गोदावरी नदी पात्रावर रेती माफियांचा पुनश्च मुक्त वावर सुरू झाला असून रात्रंदिवस हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे.

याकडे महसूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने शासनाला महसूला अभावी लाखो रुपयांचा चुना लागत आहे.

नांदेड शहरालगत ग्रामीण भागात नागापूर वांगी सिद्धनाथ या नदीकाठच्या गावासह गोदावरीच्या दोन्ही बाजुने तेथील घाटावर रेती माफियांनी संपूर्णपणे ताबा मिळविला असून दररोज हजारो ब्रास रेती उपसा करून साठविली जाते.विनापरवाना रेती उपसा व साठा करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या रेती माफिया वर महसूल प्रशासनाचा अंकुश राहिलेला नसून लक्ष्मी दर्शनाच्या प्रभावाने याकडे डोळेझाक होत आहे.

महसूल कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ  असल्याने वाळू तस्करांचे फावते आहे.नदीपात्रात तराफे सोडून रेती उपसा करण्याबरोबरच सक्शन पंपाद्वारे दिवसाढवळ्या वाळू काढली जाते.महसूल प्रशासनाने यापूर्वी वाळूतस्करावर कारवाईचे सत्र अवलंबिले तरी केवळ त्यांचे तराफे जाळून व काही अंशी दंडात्मक कारवाई करून चौकशीचा फार्स उभा केला गेला.महसूल प्रशासनाच्या धाडसत्रा दरम्यान  काही काळ रेती तस्करांनी उसंत घेतली होती.

गोदावरी नदीला आलेला महापूर ओसरल्यानंतर वाळूमाफियांनी पुनश्च नदीपात्राचा ताबा घेत परराज्यातील मजुरांद्वारे वाळू उपसा करत आहेत.

नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांच्याकडे या बेसुमार वाळू उपसा तक्रारी वाढल्यानंतर त्यांनी स्वतः नांदेड शहरासह तालुक्यात धडक कारवाई केली परंतु या माफियांनी रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रेती उपशासाठी नवनवीन घाट ग्रामीण भागात निर्माण करून झारीतील शुक्राचार्यांच्या मदतीने लाखो रुपये महसूल बुडवला जात आहे. तर रेती वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ते निर्माण केल्यामुळे शेतीच्या नुकसानी सह प्रदूषणातही वाढ होत आहे.

नांदेड महसूल मंडळातील जबाबदार अधिकाऱ्यांचा रेती माफियांवर ढिल अंकुश राहीला नसल्याने प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी  जनतेतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या