Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज चे महिला उद्योजकता धोरण जाहीर

मुंबई ः महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था *महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर* तर्फे *जागतिक महिला उद्योजकता दिनाचे* औचित्य साधुन महाराष्ट्रासाठी *महिला उद्योजकता धोरण* जाहीर करण्यात आल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर चे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता धोरणामध्ये प्रामु‘याने खालील उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
-   महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण महाराष्ट्र चेंबरतर्फे उपलब्ध करून दिले जाईल
- राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजिकांसाठी उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, राज्य व केंद्र सरकारच्या योजना याविषयी माहीती देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र येत्या दोन वर्षात सुरू करण्यात येतील.
- महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितिसाठी सर्व सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महिला उत्पादन क्लस्टर्स ची उभारणी केली जाईल
- महिलांची उत्पादने विक्रिसाठी संपुर्ण राज्यात विक्री व प्रदर्शन केंद्र उभारली जातील.
- विविध बँकांबरोबर सकार्य करार करून महिलांसाठी प्रकल्प उभारणी कर्ज सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करून दिले जाईल.
- *महिला उत्पादन क्लस्टर्स* व *विक्रि  व एक्झीबिशन सेंटर्स* निर्मिती चा कालबध्द कार्यक्रम निश्‍चित केला असुन *2022* मध्ये नाशिक, नागपुर, लातुर, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व *2023*  मध्ये जळगांव, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली, अकोला, जालना या जिल्ह्यात केंद्रांचा प्रारंभ केला जाईल. उर्वरीत सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 2027 या चेंबरच्या शताब्दि वर्षापर्यंत ही योजना पुर्ण करण्यात येईल.
महाराष्ट्र चेंबरच्या अंतर्गत राज्यस्तरीय महिला विभागाबरोबरच चेंबरच्या सहा विभागात विभागीय महिला समिति कार्यान्वित केल्या जातील.
चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या कोअर समितिच्या मार्गदर्शनाखाली *महिला उद्योजकता धोरणाची* अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहीती देऊन ललित गांधी म्हणाले की 2022 मध्ये *नाशिक* मधील महिला उद्योजकता क्लस्टर च्या उद्घाटनापासुन याच्या अंमलबजावणीची सुरूवात केली जाईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या