Advertisement

Responsive Advertisement

केएनआर ग्रुपच्या माध्यमातून आमाजान बाबाजान यांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा...


 
धर्माबाद:- सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान बनलेले धर्माबाद येथील  रहमत नगर तहसील कार्यालय च्या बाजुला आसलेल्या एच केएनआर आमाजान बाबाजान  यांचा वार्षिक  संदल-ए-खास विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त   दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी पवित्र चादर शरीफची मिरवणूक  दर्जाच्या बाजुला आसलेल्या मोकळ्या जागेवरून काढण्यात  आली. दर्शनासाठी भाविक आले होते.भाविकांच्या चेह-यावर आनंद उसळला दिसुन आले.वार्षिक संदल दरवर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातो. सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुढे येत असलेले एच केएनआर आमाजान बाबाजान यांच्या दर्गायेथे अनेक भावीकांचे बिना ऑपरेशन अनेक बिमा-या वर नि शुल्क उपचार होऊन लोक बरे होत आहेत आसे अनेक उपचार झालेले व त्यांचे नातेवाईक बोलत आहेत  संदलसाठी धर्माबाद तालुक्यासह इतर तालुक्यातुन  तेलंगाण्यातुन आलेले  अनेक भावीक  संदल मध्ये सहभागी झाले होते.  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १३ नोव्हेंबर  २०२१ रोजी हजरत आमाजान बाबाजान  दर्गाहचा संदल कार्यक्रम संपन्न झाला. एच केएनआर ग्रुपने या वर्षीही आमाजान बाबाजान  यांच्या केएनआर ग्रुपने संदल व उरुर्स आणि कव्वालीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातही अनेकांनी उपस्थिती लावून आनंद लुटला.  कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहून कव्वालीचा आनंद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या