Advertisement

Responsive Advertisement

गोरगरिबांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची भूमिका नाही - आस्तिक कुमार पांडेऔरंगाबाद:कोणाच्याही घरावर बुलडोझर चालवावे, अशी कोणतीही भूमिका मी घेणार नाही. गोरगरिबांची घरे नियमित व्हावीत यासाठीच गुंठेवारीतून प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी त्यास प्रतिसाद द्यावा म्हणून मी तसा इशारा दिला होता. आता लेबर कॉलनीतील शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर बुलडोझर चालणारच आहे. अशी वेळ इतर ठिकाणी येऊ नये म्हणून नागरिकांनी अनधिकृत बांधकामे गुंठेवारीतून नियमित करुन घ्यावीत. शहरातुन होणारा विरोध, राजकीय दबाव तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासक बॅकफूटवर आल्याचे तसेच त्यांचा सूर नरमल्याचे दिसून येत आहे.गुंठेवारी नियमित करण्यासाठी राजकीय पक्षांकडूनही सहकार्य केले जात आहे. त्यामुळे गुंठेवारीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयात वास्तू विशारदांचे पथक बसणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी – दिली. शहरातील वक्फ बोर्डाच्या जागा लीजवर दिल्या आहेत. या जागांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे केली आहेत. ती गुंठेवारीत नियमित केली जातील. वक्फ बोर्डाने एनओसी दिली, तर मनपाकडून गुंठेवारीत ही बांधकामे नियमित करण्यात येतील.ग्रीनझोन आणि आरक्षणांतील बांधकामे नियमित करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही पांडेय म्हणाले. गुंठेवारी मालमत्ता नियमित करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने नियुक्त केलेल्या वास्तुविशारदांच्या पॅनलपैकी काहींनी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगररचना उपसंचालक ए.बी. देशमुख यांनी पैसे मागणाऱ्या वास्तुविशारदांना इशारा दिला आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले असून नागरिकांनीदेखील संचिका तयार करण्यासाठी कोणतेही शुल्क वास्तु विशारदांना देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या