Advertisement

Responsive Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी दिलीप कदम तर ता.सचिव पदी राजू सोनकांबळे याची निवड.....


धर्माबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर  यांच्या आदेशानुसार धर्माबाद येथे शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली आहे. सदरील  बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल ह्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर ,माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील याच्या आदेशानुसार धर्माबाद तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांची निवडी तालुकाध्यक्ष हानमंत पाटील जगदंबे पिंपळगावकर यांनी केले आहे.तालुका सरचिटणीस पदी दिलीप कदम, तालुका सचिव पदी राजु सोनकांबळे, सचिव पदी राजेश ठाकुर,तर सदस्य पदी आयुब हसनमियाॅ शेख याची निवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हानमंत पाटील जगदंबे पिंपळगावकर, जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्टी, युवक नायगाव विधानसभा अध्यक्ष पंडीत पाटील जाधव,  सुधाकर जाधव,  युवक तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील चोळाखेकर, युवक शहराध्यक्ष मोसीन खान, विद्यार्थी तालुकाध्यक्ष नितेश  बिजेगावे, विद्यार्थी शहराध्यक्ष किरण गजभारे, ग्रंथालय तालुकाध्यक्ष शिवा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बाबुराव गोणारकर, ओबीसी तालुकाध्यक्ष दत्तात्रय संज्जन सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या