Advertisement

Responsive Advertisement

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबत दिल्लीत होणार बैठक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती


औरंगाबाद : हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार, देशात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यातीलच मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अरावती, वर्धा आणि नागपूर अशा दहा जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. या कामासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. याबाबत लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे.मुंबई नागपूर बुलेट ट्रेन चा प्रकल्पावर लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत माहिती दिली. आतापर्यंत या कामासाठी समृद्धी महामार्गालगतची जमिन वापरण्यात आली होती. यामध्ये आणखी नव्याने ३८ टक्के जमीन शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचे काम आणखीनच दर्जेदार होण्याच्या मार्गावर आहे.बुलेट ट्रेनचा मार्ग समृद्धी महामार्गालगत असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादन कमी प्रमाणात होणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची देखील भेट घेतल्याचे दानवे यांनी सांगितले. अमरावती उसळलेल्या दंगली या महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची टीका यावेळी रावसाहेब दानवे यांनी केली आहे. अशा प्रकारच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घ्यायला हवी होती. असेही त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या