Advertisement

Responsive Advertisement

कॅनॉट प्लेसने घेतला मोकळा श्वास; औरंगाबाद महापालिकेची कारवाई


औरंगाबाद : कॅनॉट प्लेस भागातील नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सोमवारी (दि. १५) कारवाई करत सुरक्षा रक्षकांसाठी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या खोल्या व इतर अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला.कॅनॉट परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी पूर्व बाजूने नऊ मीटरचा रस्ता आहे. मात्र हा रस्ता केवळ कागदावरच होता. आठ ते दहा अतिक्रमणे करून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याच परिसरातील रहिवाशांनी रस्त्यावर लोखंडी लावून, चहाच्या टपरी टाकल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने सोमवारी कारवाई करत एसबीआय बँकेपर्यंतची सर्व अतिक्रमणे काढली. सुरक्षा रक्षकांसाठी खोल्या बांधून त्यामध्ये खाजगी व्यक्तीचे सामान ठेवण्यात आले होते. या दोन्ही खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या. तीन ठिकाणी लोखंडी गेट लावण्यात आले होते ते काढण्यात आले. दरम्यान कॅनॉट परिसरात फुटपाथवर लावण्यात आलेले दुकानांचे फलक, लोखंडी टपरी, हॉटेलच्या खुर्च्यांचे अतिक्रमणे काढण्यात आली.बीएसएनएल कार्यालयाच्या निवासी संकुलाजवळ ४० मीटर बाय दोन मीटर या आकाराची लोखंडी जाळी लावून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होते. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी दोन दिवसाचा वेळ मागून घेतला. ही कारवाई प्रशासक अास्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक गवळी, सय्यद जमशीद, सुरासे, मझहर अली स्मार्ट सिटीच्या स्नेहा नायर यांच्यासह पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या