Advertisement

Responsive Advertisement

खासदारातला डॉक्टर; अस्वस्थ विमान प्रवाशावर उपचार करत खा. कराडांनी घडवले माणुसकीचे दर्शन
औरंगाबाद : खा. डॉ. भागवत कराड यांच्या कर्तव्यदक्षतेचा तसेच खासदारात लपलेल्या एका अनुभवी डॉक्टरचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सोमवारी विमान प्रवासादरम्यान समोरील एका प्रवाशास अचानक उद्भवलेला त्रास पाहून कराडांनी या रुग्णावर तात्काळ उपचार केले. याआधीही रस्त्यावरील अपघातग्रस्तास मदत करत भागवत कराडांनी आपल्या सुह्रदयतेचे दर्शन घडवले होते.याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे, यात त्यांनी म्हटले आहे काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट १२ ए या सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली. व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो. विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोप सुश्रुषा केली.आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते. याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या. अशाप्रकारची पोस्ट शेअर करत आपला अनुभव आणि मिळालेले समाधान डॉ. कराड यांनी व्यक्त केले आहे. याआधीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या अपघातात अपघातग्रस्तांना खा. कराड यांनी मदत केली होती. त्यांच्यातील या डॉक्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या