Advertisement

Responsive Advertisement

ग्रामसेवक संघटनेचे सचिव डि.जी.कोंडामंगल यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामाउमरी तालुका प्रतिनीधी.
उमरी; तालुक्यातील ग्रामसेवक डि.जी.कोंडामंगल साहेब यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ई.136 या संघटनेच्या उमरी तालुका सचिव पदाचा राजीनामा संघटनेचे जिल्हाध्यक्षाकडे दिल आहे.
सदर,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा उमरी या संघटनेच्या सचिव या पदावर कार्यरत असलेले डि.जी.कोंडामंगल यांनी आपल्या वैयक्तिक अडचण असल्यामुळे संघटनेत काम करण्यासाठी पुरेशा वेळ देता येत नसल्यामुळे मी ता.सचिव पदाचा राजीनामा माझ्या स्वखुशीने देत  आहे.
कोंडामंगल साहेब पुढे म्हणाले की,मी पदावर जरी नसलो तरीही ग्रामसेवक संघटनेच्या सोबतच राहीन आणी संघटना वाढीसाठी सतत काम करत राहीन असे अभिवचन त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे, तरी जिल्हाध्यक्ष साहेबांनी राजीनामा मंजूर करून संघटनेतून कार्यमुक्त करण्यात यावे असेही निवेदनात नमूद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या