Advertisement

Responsive Advertisement

बुद्धाच्या शांतप्रिय मार्गाने अति संवेदनशील असलेला म्हैसा मंडळ शांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना


 धर्माबाद-  महाराष्ट्र तेलंगाना सीमेवर असलेला म्हैसा मंडळ हा अतिसंवेदनशील  तालुका पहिल्यांदाच अतिशय शांत राहिला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर लगेच म्हैशाच्या नामांकित मंडळीच्या आवाहनानंतर शांततेत पुन्हा नांदेडच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पंच अष्टधातुचा पुतळा बसवण्यात आला असून लवकरच त्या पुतळ्याचे उद्घाटन होणार असल्याचे  एस. सी. फॉर एससीज राइट्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. सायलू दादा म्हैसेकर यांनी धर्माबाद च्या प्रसारमाध्यमांना घटनास्थळावर नेऊन माहिती दिली.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हैसा येथील बसस्थानक व शासकीय रुग्णालयाच्या समोर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका मुस्लीम समाजाच्या माथेफिरू तरुणांकडून विटंबना झाली. हा माथेफिरू तरूण धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या मागचे गौडबंगाल मात्र अद्यापही निष्पन्न झाले नसले तरी त्याची मात्र तीन वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाल्याचे एम सायलू दादा म्हैसेकर यांनी सांगितले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर तेलंगाना व महाराष्ट्राच्या सीमा धगधगत होत्या. सदर घटनेचा निषेध होत होता. व कुठल्याही क्षणी ठिणगी पडून दंगल पेटण्याची सीमावर्ती भागात व अतिसंवेदनशील असलेल्या म्हैसा शहरात शक्यता होती. दर वर्षी म्हैसा शहरात एक तरी दंगल हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये होत असते. पण बौद्ध व मुस्लीम धर्मीयांमध्ये कधीच दंगल झाली नाही. ही दंगल पेटावी असे काही दुष्ट शक्तीचा मनसुबा असावा. पण एसी. फार एस्सीज राईट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम सायलू दादा म्हैसेकर,सामाजिक कार्यकर्ते प्रसन्नजीत आग्रे, शंकरराव चंद्रे, गिरधारी जंगमे, माजी नगरसेवक भीमराव डोंगरे, बीजेपी चे विद्यमान नगरसेवक गौतम पिंगळे, माजी नगरसेवक गंगाधर दगडे, एडवोकेट शंकर गडपाळे, एडवोकेट भीमराव वन्नेकर यांनी व मुस्लीम समाजातील मान्यवरांनी आपापल्या धर्मियांना शांततेत राहण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. व शासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.या पार्श्‍वभूमीवर अति संवेदनशील असलेले म्हैसा शहर व तेलंगणा महाराष्ट्र सीमावर्ती भाग अतिशय शांत राहिला. एवढेच नाही तर सर्वांनी एकजुटीने योगदान देऊन तब्बल पंधरा लक्ष रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अकरा फूट उंचीचा पूर्णाकृती अष्टधातुंचा पुतळा पुण्यावरून मागवून लगेचच प्रतिष्ठापना करण्यात आली असून, लवकरच मान्यवरांच्या हस्ते यांचे उद्घाटन हे अधिकृत रित्या होणार आहे. म्हैसा शहर शांततेत ठेवणाऱ्या मान्यवरांचे मात्र तेलंगाना महाराष्ट्र सीमेवर कौतुकाचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांना त् निमंत्रित करून सायलू दादा यांनी माहिती दिली. यावेळी प्राध्यापक रामचंद्र धावणे, पत्रकार संजय कदम, गंगाधर धडेकर, सुदर्शन वाघमारे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या