Advertisement

Responsive Advertisement

३०-३० च्या गुंतवणूकदारांच्या तक्रारींसाठी आर्थिक गुन्हे शाखा राबणार विशेष शिबीरऔरंगाबाद : पैठण तालुक्यात ३०- ३० योजनेचा धुमाकूळ घालत अनेकांना गंडविले आहे. या योजनेचे जाळे पैठणसह कन्नड तालुक्यातही पसरलेले आहे. या योजनेत फसवणूक झालेल्यांनी तक्रारी नोंदवाव्यात, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले आहे. या प्रकरणातील विजय रामभाऊ ढोबळे (रा. जांभळी, ता. पैठण) व संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड (रा. मुंडवाडी तांडा, ता. कन्नड) हे पसार आहेत.३०-३० या योजनेतून दामदुपटीचे आमिष दाखवत टोळीने अनेकांना कोट्यवधींना गंडविले आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात नुकताच ज्योती रघुनाथ ढोबळे (३०, रा. जांभळी, ता.पैठण) यांच्या तक्रारीवरून फसवणूक व एमपीआयडी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोबळे आणि राठोड या दोघांची नावे समोर आली आहेत.मात्र, या दोघांनी पैसा गोळा करण्यासाठी दलालांची नेमणूक केली होती. त्यांची नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त तक्रारदारांनी समोर यावे यासाठी २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेने शिबीराचे आयोजित केले आहे. २२ नोव्हेंबरला सकाळी अकरा ते दुपारी दोन या काळात चिकलठाणा पोलिस ठाणे, २३ नोव्हेंबरला त्यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा आणि २४ नोव्हेंबर रोजी बिडकीन पोलिस ठाण्यात शिबीर घेतले जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या