Advertisement

Responsive Advertisement

सुरुवातीच्या काळात मी सायकलवरून गावोगावी फोटो काढायला जायचो...- शांताराम मगरवैजापूर -  तालुक्यातील तलवाडा येथील छायाचित्रकार शांताराम मगर यांनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या कॅमेर्‍याची पुजा केली या वेळी मगर यांनी काही अनुभव शेअर केले यावेळी शांताराम मगर म्हणाले
फोटोग्राफी ही एक कला आहे. छायाचित्रकाला एक चांगली दृष्टी असावी लागते, मात्र फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्र हजार शब्दांची गरज भागवते. फोटोग्राफी ही अशी कला आहे.
प्रेस फोटोग्राफी करतांना फोटो कढण्यापुर्वी कशासाठी व का काढायचा आहे हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे व प्रकाशाची जाण असली पाहिजे.
यशस्वी छायाचित्रकार बनण्यासाठी आपल्याकडे वास्तविक सौंदर्य पाहण्याची दृष्टी व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. 
आपली दृष्टी एखाद्या कविसारखी पाहिजे. जे ना देखे रवी... ते पाहे कवी. असे म्हटले जाते. कवीकडे ज्याप्रमाणे नवीन पाहण्याची दृष्टी असते, त्याप्रमाणे छायाचित्रकाराची दृष्टी असायला पाहिजे. 

पुढे बोलतांना शांताराम मगर म्हणाले मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. घरात कोणत्याही प्रकारची पार्श्‍वभूमी नसताना फोटोग्रफी क्षेत्राविषयी असणारे कुतूह गप्प बसून देत नव्हते.
एक कॅमेरा खरेदी केला.फोटोग्राफीला सुरुवात केल्यावर सुरुवातीच्या काळात सायकलवरून गावोगावी फोटो काढायला जायचो. त्यात प्रामुख्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे आयडेंटीचे फोटो असायचे
व वेळ मिळेल तसा निसर्गामध्ये भटकंती करून पक्षी, प्राण्यांच्या वेगवेगळ्या छटा टिपायला सुरुवात केली. सुरुवातीला याकडे फक्त छंद म्हणून पाहिले जात होते; परंतु या वेडापायी फिरताना खिशाला आर्थिक चणचण भासू लागली म्हणून व्यावसायिक फोटोग्राफीकडे वळण्याचा निर्णय घेऊन लग्नाची फोटोग्राफी सुरू केली. कामाचा दर्जा व वेगळेपण पाहून मोठ-मोठय़ा ऑर्डर मिळू लागल्या व मी या छंदाला व्यवसायाचे स्वरूप दिले. यानंतर महाराष्ट्रात फोटोग्राफी व्यवसायानिमित्त फिरलो; पण एक सामाजिक दायित्व म्हणून अंपग ग्राहकांचे मी आजही पैसे घेत नाही.
उगवणारा प्रत्येक दिवस अन् मावळणारी प्रत्येक रात्र फोटोग्राफरच्या कॅमेर्‍यात नवा रंग भरणारी असते. फक्त त्याच्याकडे ती दृष्टी असली पाहिजे. विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आता मोबाईलच्या जमान्यात प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आलाय; पण हातात कॅमेरा आला की, फोटोग्राफर होता येत नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे. फोटोग्राफी ही एक कला आहे. आणि कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी तपश्‍चर्या ही करावीच लागते
समोर एखादं दृष्य दिसते, घटना घडते; पण क्लिक कधी करायचे याची अचूक वेळ ज्याला उमगली तो चांगला फोटोग्राफर होऊ शकतो. शिवाय त्याच्यावर कलात्मक संस्काराचा हात फिरवणे व सौंदर्य खुलवणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. पूर्वी हे संस्कार डार्करूममध्ये 70 टक्के होत असे. आज संगणकाच्या युगात हे अधिक सुलभ झाले आहे. पण या क्षेत्रातील स्पर्धा आजही आहे. फक्त स्पर्धेचे स्वरूप बदललेले आहे. पूर्वी जुन्या स्वरूपाचे कॅमेरे होते. त्यावेळी एक क्लिक केले की, त्यात नेमके काय आले आहे. हे फोटो धुतल्याशिवाय कळत नव्हते.
परंतु आता डिजिटलच्या जमान्यात एकापाठोपाठ एक आसे कितीही क्लिक केले तरी चालतात. त्यातून डिस्प्लेही बघता येतो. खरंतर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दृष्य सुंदरच असते. त्याचे सौंदर्य खुलवणे; मात्र त्या फोटोग्राफरच्या हातात असते. 

त्यानंतर मी प्रेस फोटोग्राफी करत असतांना मला थरारक अनुभव आला.
यामध्ये मी वैजापुर तालुक्यातील ब्हळेगाव येथील आठ जानाना जखमी करत धुमाकूळ घातलेल्या बिबट्या थरार कॅमेर्यात टिपण्या प्रयत्न करत असतांना जमावाच्या आवाजाने बिबट्या विचलित झाला व सरळ आमच्या दिशेने आक्रमण करून आला. आमच्या प्रंसगावधानाने आमचा जीव वाचला,हा अनुभव हृदयाचा ठोका चुकविणारा होता.
त्यानंतर मुंबई येथील निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतांना परस्पर विरोधी गटात हणामरी झाली दोन विरोधी गट एकमेकांसमोर आले. वाद सुरू झाला, दगडफेक सुरू झाली. त्यावेळी मी चक्क हेल्मेट घालून  फोटोग्राफी करत होतो. त्यातील काही दगड माझ्या हेल्मेटवरही लागले. पोलिसांनी वेळीत खबरदारी घेत मला बाजूला घेतले.
माझा सर्वात महत्त्वाचा अनुभव मला वारीमध्ये मिळाला. मी या वर्षी पायी वारीला गेलो होतो
वारीमधल्या विविध छटा टिपण्याचे काम करीत असताना
यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असणारी वारी तिचे विविध पैलू गावापर्यंत पोहोचविण्यासाठी वारीमधील अनेक फोटो काढले व त्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विविध पैलू मला टिपण्यास मिळाले.
मुंबई सह अन्य ठिकाणी निवडणूक काळात आचार सहितेसाठी लागणारे सुमारे 200ते 250 कॅमेर्याचा पुरवठा आता माझ्या कडुन होतोय  कष्ट करण्याची तयारी व जिद्द असल्यास कुठल्याही व्यावसायात हमखास यश मिळवता येते 

■■ छायाचित्रकार व्हायचंय. ..■■ 

ज्याच्याकडे निर्मितीक्षमता आहे, ज्याचा दृष्टिकोन विकसित झालेला आहे, ज्याला प्रकाश-संधी प्रकाशाची उत्तम जाण आहे, जो सर्जनशील गोष्टींचा शिस्तबद्ध विचार करू शकतो, आणि निसर्गत: उपजलेल्या बाबींशी एकरूप झाली आहे, ज्याला व्यक्तींच्या चेहऱ्याबरोबरच निसर्ग आणि प्राणी-पक्ष्यांच्या चेहऱ्यामोहऱ्यांचे अतोनात वेड आहे, अशी कोणतीही व्यक्ती उत्तम छायाचित्रकार बनू शकते. कदाचित त्याचे तथाकथित औपचारिक शिक्षण प्राथमिक स्तरावरचे असेल किंवा नसेलही. अशा छायाचित्रकारा हा उत्तम व्यावसायिक बनु शकतो
तुम्हला उत्तम छायाचित्रकार व्हायचे असेल तर आवश्यक कौशल्ये रंगसंगतीची उत्तम जाण हवी तसेच नवनिर्मितीची क्षमता, कलात्मक भान, दृश्यमांडणीची कल्पकता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास, प्रसंगावधान, आवड, जागरूकता ही कौशल्ये जोपासायला हवीत.
व्यावसायिक छायाचित्रणाबरोबरच पोर्टेचर, फोटो जर्नालिझम, अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, जंगल फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, मेडिकल फोटोग्राफी या शाखांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आश्चर्य म्हणजे अशा स्पेशल फोटोग्राफीमध्ये उत्तम पैसा, मिळवता येतो
मात्र येथील वावरासाठी मोठय़ा धावपळीची गरज असते. वेळेचे बंधन पाळावे लागते. मेहनत, प्रसंगावधान हे गुण अंगी बाणवावे लागतात. शोध पत्रकारिता ताकदीची असावी लागते. एखाद्या घटनेची सुरुवात ते अंत यात बराच कालावधी जातो. तो कालावधी पार पाडण्याचा संयम असावा लागतो. छायाचित्रकाराकडे सर्वात महत्त्वाचा गुण असावा लागतो तो जनसंपर्काचा, सुहास्य वदनाचा आणि प्रसंग येईल त्याप्रमाणे स्वत:ला मुरड घालून अ‍ॅडजस्ट करून घेण्याचा..
छायाचित्रासाठी योग्य पोज देण्यास समोरच्याला उद्युक्त करता आले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती करता आली पाहिजे.
त्यासाठी चिकाटी,काम करण्याची मनापासून तयारी, समयसूचकता, अंतर्गत सजावटीचे भान, उत्तम सौंदर्यदृष्टी, तत्परता आणि उत्तम निर्मितीक्षमता हे गुण महत्त्वाचे ठरतात. महत्त्वाचे म्हणजे फोटोसाठी योग्य ती पोज देण्यास समोरच्याला उद्युक्त करता आले पाहिजे. त्यासाठी एखाद्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये उत्तम वेतनावर काम करता येते तसेच करारतत्त्वावर काम करीत इतर ठिकाणी पैसे कमावू शकता. किंबहुना अनुभव घेत टप्प्याटप्प्याने स्वत:ची जाहिरात संस्था काढता येते.-संपादक, केबल नेटवर्क, वाहिन्या यांच्याशी उत्तम संबंध असले पाहिजे. मोठमोठय़ा उद्योगांच्या उत्पादनाची तसेच शासकीय योजनांची इत्थंभूत माहिती जवळ बाळगताना त्यांचा फॉलोअप ठेवता यायला हवा. वृत्तपत्रे, वाहिन्या आणि उद्योजक-व्यापारी यांच्यातील मध्यस्थ म्हणून उत्तम काम करता आले पाहिजे. करारपत्र करताना आर्थिक गणिताचे उत्तम ज्ञान हवे. त्याचबरोबर जाहिरात क्षेत्रात घडणाऱ्या बारीकसारीक बाबींच्या महत्त्वाच्या नोंदी असणे आवश्यक आहे.संगणकावरील फोटोशॉपीच्या अगदी अलीकडच्या छायाचित्रणासंबंधित घडामोडींबरोबरच अशा व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्याकडे छायाचित्रणातील जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे उपजत भान असले पाहिजे.
अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफीबरोबरच आज आघाडीवर असलेली छायाचित्रणाची आणखी एक शाखा म्हणजे फॅशन फोटोग्राफी होय.
त्यामुळे याच छायाचित्रातील आणखी एक कमाल म्हणजे दागदागिन्यांचे छायाचित्रण. त्यातील बारीक कलाकुसरीची नोंद घेणारी फोटोग्राफी.
त्यामुळेच फॅशन फोटोग्राफीमधील कपडय़ांची, दागिन्यांची तसेच फॅशन पत्रकारिता इ. क्षेत्रातील फोटोग्राफी विशेष उल्लेखनीय ठरू शकते.
जागतिकीकरण,व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी स्वीकारलेली नवी आव्हाने, जीवघेणी स्पर्धा, मालविक्रीची नवनवी तंत्रे, निर्यातीस मिळालेले प्रोत्साहन, आयात-निर्यात क्षेत्रातील औद्योगिक मालास उठाव मिळावा म्हणून तयार केलेली देखणी पत्रके इ. बाबींमुळे  फोटोग्राफीला मोठी अर्थमान्यता मिळाली आहे.
स्पेशल मिडीयामुळे फोटोग्राफीचा चागंले दिवस
व्यावसाय आणि हौशी फोटोग्राफी
छायाचित्रण व्यावसायिक तसेच हौशी अशा दोन
विभागांत विभागली गेली आहे. केवळ व्यावसायिक फोटोग्राफीतच उत्तम अर्थार्जन होते असे नाही तर हौशी छायाचित्रकारही छंद जोपासताना उत्तम पैसे कमवू शकतात
शांताराम मगर मो 9421417540

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या