Advertisement

Responsive Advertisement

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेला सत्कार अविस्मरणीयशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केल्या भावना


औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचे व्यक्तीमत्व, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी ऐकताच धक्का बसला. देशासह महाराष्ट्रभर शिवचरित्र व विचारांचा प्रसार प्रचार करतांना अनेकदा त्यांची भेट घेऊन आशीर्वाद मिळाले. 
आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे माझी शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर यांच्याहस्ते झालेला सत्कार कदापि विसरू शकत नाही. शिवसेना परिवार व संपूर्ण शिवप्रेमी जनेतच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. पुरंदरे यांनी आजच्या युवापिढीला शिवकालीन इतिहास पुन्हा जिवंत व मूर्तिमंत उदाहरणे देऊन जागा ठेवण्याचे कार्य केले आहे असेही चंद्रकांत खैरे म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या