Advertisement

Responsive Advertisement

जुन्नी येथे भगवान पार्श्वनाथ मंदीराचे भूमीपूजन.....धर्माबाद: तालुक्यातील मौजे जुन्नी येथे जैन समाजाचे भगवान पार्श्वनाथाच्या मंदीराचे भुमीपुजन रविवारी सकाळी जैन धर्म गुरूच्या उपस्थिती करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद तालुक्यातील मौजे जुन्नी येथे हेमाडपंथी मंदीर असलेल्या गावात विघ्नहर्ता भगवान पार्श्वनाथ (दिंगबर पंथी) जैन मंदीराच्या बांधकामांचे भूमीपुजन जैन समाजाचे आचार्य श्री १०८ पवित्र सागरजी महाराज, याँच्या मार्गदर्शन नुसार श्री.१०८ मुनि प्रशांतसागरजी महाराज मुनि श्री.१०८ प्रभावसागरजी महाराज,मुनि श्री.१०८ प्रभातसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत चांदीचा टिकास व चांदीचा फावड्याने शुभारंभ करण्यात आले आहे.व जुन्नी येथे ध्वजारोहन,पूजा, आरती महाराजंचे प्रवचन,महाप्रसाद कारण्यत आले होते.या जैन मंदिरासाठी श्रीमती सुमनबाई विठ्ठलराव होगे यांनी स्वताच्या मालकीची ५ हजार चौ.फूट जागेचे दानपत्र करून दिले आहे.या मंदीराचे गर्ब गृह विद्याताई कैलासराव कानोडे हे बांधकाम करणार असून शिकराचे बांधकाम स्वनिल विजयकुमार लुंगाडे हे करणार आहेत.
मंदिराच्या भूमीपूजन संभारभास पाच कळस धारी महीला पुढील प्रमाणे ,दिंगबर जैन समाज महीला मंडळ, धर्माबाद,सौ.शांता श्रेणिक जोगे, नांदेड, अपेक्षाताई शैलेशकुमार बाकलीवाल मनमाड,सौ निर्मलाताई विलासराव कानोडे,प्रणिता प्रशांत यांनी कळशातील पंच अमृतजलाने जागा पवित्र केली.जैन धर्मगुरू यांच्या उपस्थितीत धर्माच्या विधीनुसार पुजापाठ करण्यात आली.यावेळी लवलेश महाजन   नितीन जैन नांदेड (पुजारी)व पवन अंबोरे परभणी यांनी पुजाविधी संपन्न केला आहे. व महाराज याँच्या आहार येथे धर्माबाद येथिल महिला प्रगति लुहाड़े, सपना कासलीवाल,राखी गोधा,रेखा पांडे,निकिता कासलीवाल,शिला पहाडे,माया गोधा ,उषा लुहाड़े ,रजनी सोनी,अर्चना पांडे, त्रिशला कासलीवाल ,अनिता लुहाड़े व समस्त महिला मंडल उपस्थित होते.

धर्माबाद तालुक्यातील मौजे जुन्नी येथे हेमाडपंथी मंदीराच्या परीसरात अनेक देवतांच्या मूर्ती आहेत.त्यापैकी १००८ विघ्नहर्ता पार्श्वनाथ दिंगबर जैन यांची पाच फूट उंचीची मुर्ती उघड्यावर होती.हे जैन धर्मीयांच्या लक्षात आल्याने धर्माबाद व नांदेड येथील जैन कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला,त्यामध्ये नांदेड येथील अँड शैलेश कोंडेकर,महावीर लोहांडे , कैलास काला , ओमकार कवळासे,अनुप कासलीवाल, यांनी पुढाकार घेतला.सदरील मंदीराच्या कामांसाठी शहरातील अनुप कासलीवाल,महावीर लुहाडे, अनुज लुहाड़े, राजेंद्र कासलीवाल,धरम पहाडे,प्रकाश सोनी,मेहेद्र पांडे, कमल लुहाड़े,सुभाष गोधा,सुनिल गोधा, चैतन्य सोनी, अंकित गोधा, प्रणय पहाडे,अमित कासलीवाल,अविराज लुहाड़े,दर्शन लुहाड़े . संजय कानोडे. महावीर घोडके. उमरी .आसेगव मंदिर अध्यक्ष प्रकाशजी सेठी,विकास मोहाले,श्रनिक जोगे,शैलेश महाजन,डॉ.अनिल पाटील,सुदेश कंदी,रंजित करेवार,ऋषिकेश कोंडेकर व धर्माबाद चे सर्व जैन बांधव व समस्त नांदेड़ जिल्हा जैन धर्मी लोकांच्या प्रयत्नाने हे मंदीर उभारले जात आहे.सदरील शुभ कार्यासाठी सुमनबाई विठ्ठलराव होगे यांनी जागा दान दिली आहे.तर दत्तात्रय रेड्डी सभापती. सरपंच सौ.आर्चना रेड्डी, उपसरपंच अंबादास पाटील डांगे,सौ.सोनाली चंद्रकांत पाटील,मारोती रेड्डी रामलू रेड्डी,तानाजी कोंडलवाडे, सदानंद गानलेवार,श्रावण तुरेराव .दत्तात्रय गुंडूरे,अनुसया विभुते  व सर्व ग्रामस्थयांनी बांधकामांचे मंजूरी दिली आहे.यावेळी गावकऱ्यांनी महाप्रसादाचे लाभ घेतला आहे.सदरील कार्यक्रमास अनेक ठिकाणचे जैन धर्माचे महीला व पुरुष शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माधव वाडेकर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.व कुठलही अनुचित प्रकार घडला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या