Advertisement

Responsive Advertisement

होय मी सावरकर बोलतोय’ला उस्फुर्त प्रतिसाद ध्वज दिवाळीनिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे संयोजन

औरंगाबाद- शिवसेना संभाजीनगरच्या वतीने ध्वज दिवाळीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे अयोजन केले होते. रविवारी झालेल्या तापडीया नाट्यमंदिरात होय! 'मी सावरकर बोलतोय’ या नाटकाला  रसिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
सुरुवातीला आयोजक शिवसेना नेते चंद्रकांत खैर, वैजयंती खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल आदीसह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, अनिल पोलकर, गणू पांडे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, अ‍ॅड. अशुतोष डंख, महिला आघाडीच्या संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, जिल्हा समन्वयक कला ओझा,  उपजिल्हा संघटक नलिनी बाहेती, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, स्मिता जोशी, किरण शर्मा, युवासेनेचे ऋषिकेश जैस्वाल, उपशहरप्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेवक गजानन बारवाल, गिरजाराम हाळनोर, मकरंद कुलकर्णी, सचिन खैरे, विजय सूर्यवंशी, शिवा लुंगारे, अनिल मुळे आदींची उपस्थिती होती.
या कलाकारांनी केली उत्कृष्ट भूमिका : 
होय! 'मी सावरकर बोलतोय' या नाटकात सावरकरांची भूमिका आकाश भडसावळे यांनी साकारली होती तर भालजी पेंढारकरांची भूमिका बहार भिडे, पृथ्वीराज कपूर- दुर्गश अकेकर, महात्मा गांधी- दीपक जोईल, माई सावरकर- मॅडम कामा कविता नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर- माधव जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस- शैलेश चव्हाण व बॅरिस्टर दप्तरींची भूमिका समित चौधरी यांनी साकारली. 
यावेळी ध्वज दिवाळीनिमित्ताने आठवडाभर सुरू असलेल्या कार्यक्रमाला सर्व शिवसैनिक व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या