Advertisement

Responsive Advertisement

अखिल भारतीय जिवा सेना कार्यकारिणी गठित.

धर्माबाद :- अखिल भारतीय जिवा सेना संघटनेची धर्माबाद तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले दत्तात्रय सज्जन सिरजखोडकर यांची धर्माबाद तालुकाध्यक्ष पदावरून जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या बढतीमुळे रिक्त होत असलेल्या तालुकाध्यक्ष पदावर संतोष गायकवाड यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
        धर्माबाद येथे अखिल भारतीय जिवा सेनेची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकी मध्ये कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मा.लक्ष्मण कोंडावार व नांदेड चे जिल्हाध्यक्ष राजीव राचोटकर  यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हासचिव म्हणून मा. दत्तात्रय सज्जन सिरजखोडकर यांची निवड करण्यात आली व त्याचबरोबर धर्माबाद तालुका अध्यक्ष म्हणून संतोष गायकवाड व ता.उपाध्यक्ष म्हणून सुरेश राचोटकर आणि ता.सचिव म्हणून लालाजी इमनेलू  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदरील निवडीचे सर्वांनी स्वागत केले असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या