Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद विभागात संपकऱ्यांनी केला टाळ-मृदुगांचा गजर
औरंगाबाद : एसटीचा संप संपता संपत नाहीये. न्यायालयाने खडसावूनही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. महामंडळाने निलंबनाची तलवार उपसली. अनेकांचे निलंबन झाले. खासगी गाड्या फलाटावर उभ्या राहिल्या. मात्र तरीही एसटी कर्मचारी आपल्या ध्येयावरुन मागे हटायला तयार नाहीत. आज संध्याकाळी मुंबईत परिवहन मंत्री अनिल परब यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर काही तोडगा निघण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी रविवारपासून (दि.७) पुन्हा संपावर गेले आहेत. संपाचा आज सलग ९ वा दिवस. मात्र अजूनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात महामंडळाला यश आलेले नाही. सोमवारी कार्तिकी एकादशीच्या शुभमुहर्तावर मध्यवर्ती बसस्थानकातील एसटीचा संप लवकर मिटू दे असे विठ्ठलाला साकडे घालत संपकऱ्यांनी विठ्ठलाची पूजा करत विठ्ठल रूख्मिणीचा गजर केला.या घटनेमुळे संपूर्ण मध्यवर्ती बसस्थानकच विठ्ठलमय झाले होते. औरंगाबाद विभागातील आठही आगारातील बससेवा गेल्या सात दिवसापासून बंद आहे. दरम्यान या संपावर लवकरच काही तोडगा निघेल असे वाटत होते मात्र संप लांबत चालला आहे. संपकरी कर्मचारी आपल्या घरी न जाता बसस्थानकावरच त्यांनी मुक्काम ठोकला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे औरंगाबाद विभागाचे आत्तापर्यंत ४ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच प्रवाशांना खाजगी गाड्यांच्या मनमानी भाडेवाढीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या