Advertisement

Responsive Advertisement

मिटमिटा येथे राष्ट्रिय पत्रकार दिनानिमित्त दौलताबाद पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार


पडेगाव - येथिल मिटमिटा येथे राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या औचित्याने मातोश्री प्रतिष्ठाण मिटमिटा यांच्या वतिने दौलताबाद  -पडेगाव- मिटमिटा सर्कलच्या सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ मिटमिटा पिस होम सोसायटी येथे  दिनांक १६ /११/२०२१ मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता. याकार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून माजी प्राचार्य प्रा.डॉ. जे.टी.देगांवकर,अँड.अशोक मूळे,सचिव औ.जि.व.संघ तथा अध्यक्ष    मातोश्री प्रतिष्ठाण मिटमिटा, डॉ.भांडवले सर (मा.उपकूलसचिव डॉ.बा.आ.म.वि.औरंगाबाद) डॉ,पंढरीनाथ रोकडे ,शैक्षणिक महासंघ अध्यक्ष औरंगाबाद हे प्रमूख पाहूणे म्हनून उपस्थित होते तर जेष्ठ मार्गदर्शक मा.प्रा.डॉ.गणी पटेल ( २०२०-२१ गांधी शांतता पूरस्कार प्राप्त,सेवानिवृत्त इतिहास विभाग प्रमूख तथा माजी सिनेट मेंबर डॉ बा.आ.म.वि.औरंगाबाद) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार टोपी,उपरणे, ऐतिहासिक व सांस्कृतिक खूल्ताबाद हा ग्रंथ,गूलाब पूष्प देवून सत्कार करण्यात आला.डॉ.जे.टी देगांवकर व डॉ.भांडवले यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गणी पटेल यांनी अध्यक्षिय समारोप केला. पत्रकार किशोर पाटील ,शेख जावेद अहमद,शेख आमेर, बि.के.पठाण अभय विखणकर ,शिवाजी आस्वार ,दिपक म्हस्के,आकाश ठाकूर,गौतम शिंदे ,सय्यद लयकोद्दिन आदिंची पत्रकारांची  प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात येवून स्नेहभोजनाने कार्यक्रम संपला .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  वाळूज- पडेगाव चे उद्योजक श्री शंकर बनकर ,मिटमिटा येथिल मातोश्री प्रतिष्ठाणचे सचिव प्रा.शिवाजी गायकवाड यांनी परीश्रम घेत कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करुन आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या