Advertisement

Responsive Advertisement

घसरत्या बाजार भावाची चिंता न करता शेतकऱ्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा -राम पाटील


 धर्माबाद- घसरत्या बाजार भावाची चिंता न करता शेतकऱ्यांनी योग्य भाव आपल्या शेतमालास येईपर्यंत आर्थिक चणचण भागवायची असेल तर शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन धर्माबाद बाजार समितीचे नूतन सभापती रामचंद्र पाटील बंन्नाळीकर यांनी धर्माबाद   
तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
   आज घडीला शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतकऱ्याची आर्थिक कोंडी कशी करावी व त्यांचा शेतमाल हा कमीत कमी किमतीत कसा खरेदी करावा असे षडयंत्र धर्माबाद मधीलच नाहीतर अख्या महाराष्ट्रातील व्यापारी करीत असतात. पण त्या गोष्टीला घाबरून न जाता *घसरत्या बाजार भावाची नको मनात घेतील शेतमाल तारण कर्ज योजना आहे ना हाती* या महाराष्ट्र शासनाच्या ब्रीदवाक्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमाल तारण कर्ज योजना पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे.
सदरील योजनेची खास वैशिष्ट्य म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असते, बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालावर शेतकऱ्यांना तारण कर्ज त्वरित उपलब्ध होते, कर्जाची मुदत ही सहा महिने म्हणजेच 180 दिवस असून कर्जाचा व्याजदर केवळ सहा टक्के वार्षिक आहे. सहा महिन्यांच्या कार्यकाळात आपल्या शेतमालाला जर योग्य भाव मिळाला तर शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी काढू शकतात. सदरील योजनेत सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भात,( साळी) करडई, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, हळद आदी पिकांचा समावेश असून प्रचलित बाजार भाव किंवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी असेल त्या दराने होणाऱ्या एकूण किमतीच्या कमाल 75 टक्के रक्कम ही तारण कर्जाची मर्यादा आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा कमीत भावात विकण्यापेक्षा शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा व लाभ घ्यावा असे कळकळीचे आवाहन धर्माबाद बाजार समितीचे सभापती राम पाटील बंन्नाळीकर व सचिव चंद्रकांत पाटील यांनी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या