Advertisement

Responsive Advertisement

कृषी पंपाचा वीजपुरवठा तोडण्याची भूमिका शेतकरी विरोधी; वैजापूरात भाजपचा आरोप


औरंगाबाद :अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महिती असताना महावितरण  शेतकऱ्यांकडील थकीत वीज बिल वसुलीसाठी सरकारची कृषी पंपाचा वीजपुरवठा तोडण्याची भुमिका शेतकरी विरोधी असल्याची टीका भाजपाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी केली.वैजापूर तालुक्यातील वीज प्रश्नावर राज्यातील सरकारने घेतलेल्या निर्णया विरोधात भाजपा तालुका व शहर संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर सोमवारी (दि.१५) निर्देशने करण्यात आली. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, कल्याण दांगोडे , कचरु डिके यांची प्रमुख उपस्थिती होती. खरीप हंगामात झालेल्या अतोनात नुकसानीची भरपाई रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी तयारी करीत आहेत.सध्या कृषी पंपाला महावितरणकडून रात्री ८ तासाचा होत असलेला पुरवठा पुर्ण क्षमतेने मिळत नाही. त्याकडे राज्याच्या प्रमुखासह उर्जामंत्री तसेच सचिवांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतक-यांना वीज पुरवठा मिळत नसतांनाही शेतक-यांकडून सक्तीने वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केल्यास भाजपाशी गाठ असल्याचा सज्जड इशारा परदेशी यांनी बोलतांना दिला. या आंदोलनात युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल वाणी, युवा मोर्चा शहराध्यक्ष महेश भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या