Advertisement

Responsive Advertisement

14 ते 28 जानेवारी 2022मराठी भाषा संवर्धन पंधरवडा· साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद

           
            मुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या वतिने दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो? या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी  आणि वाचन, भाषा आणि जीवन  यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.
        भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा - 2022 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.       
दि. 14 जानेवारी
            साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा लेखकांशी  संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी हे आहेत. या कार्यक्रमात  श्री.प्रणव सखदेव (कथाकार), श्रीमती सोनाली नवांगुळ (अनुवादक), रवी कोरडे (कवी), संजय वाघ, बाल साहित्यिक, सहभागी होणार आहेत या परिसंवादाच्या  अध्यक्षस्थानी श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक या असतील, प्रास्ताविक  नामदेव कोळी, आणि सूत्रसंचालन -डॉ.महादेव डिसले करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते दु.1 या दरम्यान होणार आहे.
दि. 17 जानेवारी
            मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यवरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष  महेश दत्तात्रय लोंढे  असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत.  सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.
दि. 18 जानेवारी
            आभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का? याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते - अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन - प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक - भारत जाधव करणार आहेत.
दि. 19 जानेवारी
            आभासी व्याख्यान - मी काय वाचतो?या विषयावर  वक्ते  नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक - भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या