Advertisement

Responsive Advertisement

कोविड साथ नियंत्रणासाठी 28 कोटी 54 लाख : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,:  कोविड आजाराची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना, औषधी, साहित्य सामग्री उपलब्धतेसाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, अतिरिक्त चाचणी, वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व्हेंन्टीलेटर, थर्मलस्कॅनर व इतर साधनांचा खर्च भागविण्यासाठी जिल्ह्याला राष्ट्रीय आरोग्य अभियानातून आपत्कालीन कोविड प्रतिसाद टप्पा दोनमध्ये (इसीआरपी) रु. 2854.46 लक्ष अनुदान उपलब्ध करुन देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
उपलब्ध अनुदानातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे 42 खाटांचे बालरोग कक्ष (ICU) तयार करणे व जिल्हा रुग्णालय येथे 42 खाटांचे बाल रोग कक्ष (ICU) असे एकूण 84 खाटाचे बालरोग कक्ष (ICU) तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सामग्री, यंत्रसामग्री, जिल्हा रूग्णालयात 50, उपजिल्हा सिल्लोड 30, पिशोर ग्रामीण रूग्णालय 20 अशा एकूण 100 खाटांचे आयसीयू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सामग्री, यंत्रसामग्री, ग्रामीण रूग्णालय कन्नड, पाचोड, बिडकीनसाठी Liquid Medical Oxygen Plant 10KL, ग्रामीण रूग्णालय सोयगाव व पाचोड येथे टेलीमेडिसीन सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच 50 खाटांचे गंगापूर उपजिल्हा रूग्णालय नियोजित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या