Advertisement

Responsive Advertisement

जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधायचाय…9156695872 या क्रमांकावर करा व्हिडिओ कॉल….


औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या  जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत 91566 95872 हा  मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे. या मोबाईल क्रमांकावर अभ्यागत दुपारी 3 ते 4 यावेळेत व्हिडिओ कॉल मार्फत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 
0000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या