Advertisement

Responsive Advertisement

शहराचा विकास रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी; आमदार बंब यांचे प्रतिपादन


औरंगाबाद:शहराच्या विकासात अनंत अडचणी येऊनही शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची परिपूर्ती केली, शहराचा विकास रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत बंब यांनी केले. गंगापूर शहरातील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा धरत टिका केली. तसेच कोणी कितीही अडचणी आणल्या तरीही शहराचा विकास थांबणार नाही. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.गंगापूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या तीन चौकांत सुशोभीकरण करण्यात आले आहे. या कामाचे तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज सभागृह, कायगाव रोड, राजवाडा येथील स्मशानभूमी, चावडी व श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर सभागृह या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच मजलिस बैतुलमाल सभागृहाचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब व नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी आ. बंब बोलत होते. या कार्यक्रमास भाजपचे कार्यकारिणी सदस्य किशोर धनायत, जि. प. चे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, मारुती खैरे, जि. प. सदस्य मधुकर वालतुरे आदींची उपस्थिती होती. नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. सोमवारी (दि. १७) पासून उपविभागीय अधिकारी प्रशासक म्हणून नगरपालिकेचा कारभार पाहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या