Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद पोलीस ठाण्यात माजी सैनिकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न


दौलताबाद - भारतीय सैन्य दिवसा निमित्त पत्रकार संघ व दौलताबाद पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दौलताबाद पोलीस ठाण्यात माजी सैनिकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला 
पहिल्यांदाच अश्या कार्यक्रमातून देश सेवेत झोकून दिलेल्या माजी सैनिकाची कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार व पोलीस यांच्या वतीने करण्यात आले
यावेळी बोलताना निरीक्षक आडे म्हणाल्या की आपल्या भारतीय लष्कराने स्थापना झाल्या पासून आज पर्यंत  अनेक पराक्रम केले आहेत केलेले आहेत त्यामुळे लष्करात सहभागी होऊन जे युवक देशसेवा करून परतलेले आहेत त्या सर्वांचा आपण गौरव केला पाहिजे व आपल्याला या सैनिकांचा गर्व आहे की हे सैनिक जास्तीत जास्त संख्येने शेतकरी पुत्र आहेत, आणि या सैनिकांनी सुद्धा निवृत्ती नंतर जे युवक सैन्यत जाण्यास  इच्छुक आहेत त्यांना प्रेरित करावे,व सध्या युवक सोशल मीडिया,व नशा अथवा व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यांना व्यसनापासून दूर राहण्यास प्रवृत्त करावे, म्हणजे आपली पुढील पिढी ही निर्व्यसनी होऊ शकेल, असे यावेळी मार्गदर्शन करताना श्री आडे यांनी सांगितले.
या प्रसंगी लष्करातील निवृत्त सुभेदार बाळासाहेब घुगे,अशोक हांगे,मेजर के.बी पवार,पोलीस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, पत्रकार संघाचे अभय विखनकर, शिवाजी गायकवाड, बी के पठाण,किशोर पाटील, शेख अमेर,शिवाजी गायकवाड,शिवाजी अस्वर, सय्यद लाइकोद्दीन,यांच्यासह विशाल गाजरे,पोलीस पाटील प्रमोद साठे,इस्माईल पठाण,परमेश्वर पालोदे, व पोलस कर्मचारी यांच्या सह निवृत्त लष्करी जवान यांची मोठ्या संख्येने उपस्तीती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या