Advertisement

Responsive Advertisement

भेंडाळा मारुती तीर्थक्षेत्र विकास कामांबाबत वनविभागाची बैठक संपन्न

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून विविध कामे लागणार मार्गी

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथे श्री क्षेत्र भेंडाळा मारुती संस्थान विविध कामांना वनविभागाची परवानगी लागते. तसेच रस्ते व मूलभूत सोई सुविधाच्या विकासकामांना लागणाऱ्या परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून आज संस्थान पदाधिकारी व वनविभागाची समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यांचे वनमंत्री असतांना विविध त्रुटी दूर करून अनेक तीर्थक्षेत्र व जुन्या मंदिरांना परवानगी दिल्या आहेत. स्थानिक प्रशासन व वनविभाग यांचा समन्वय असल्यास या परवानगी मिळतात. त्यामुळे विकास सध्या भेंडाळा मारुती तीर्थक्षेत्र येथे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय आणि लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून अनेक कामे मार्गी लागले आहे. यामुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता येणाऱ्या काळात सुविधांचा वानवा होऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
या बैठकीला भेंडाळा मारुती संस्थान अध्यक्ष महेश उबाळे, मुख्य वन संरक्षक गुजर, डीएफओ मनक्वार,  रत्नपुर रेंजर पेहरकर, वनपाल मातेरे, तालुकाप्रमुख राजू वरकड,   माजी सभापती किशोर कुकलारे, पोपट वेताळ, माजी सरपंच अशोक उबाळे, निवृत्ती वेताळ, अतुल चव्हाण आदीसह नागरिक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या