Advertisement

Responsive Advertisement

डॉ. भागवत कराड यांनी घेतली बॅंक यंत्रणेची झाडाझडती


औरंगाबाद-
      महिला व बालकल्याण सभापती *सौ अनुराधा अतुल चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील महिला बचत गटांना बॅकेमार्फत होणार्‍या त्रासाबद्दल तसेच वेळेवर उद्योगांसाठी कर्ज न मिळाल्याने होणाऱ्या विलंबाबाबत व नाबार्डच्या सुधारीत धोरणानुसार रक्कम रुपये दहा ते वीस लाख विनातारण वाढीव कर्ज मर्यादा महिला बचत गटांना उद्योग साठी देणे* या सर्व बाबी बाबत देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. ना.डॉ.भागवतजी कराड यांना निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्याच अध्यक्षतेखाली संध्याकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन केले होते.
     सदर बैठकीस औरंगाबाद चे मा. जिल्हाधिकारी,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद, जिल्ह्यातील सर्व बँकाचे प्रमुख अधिकारी, नाबार्ड चे अधिकारी  महानगरपालिकेचे आयुक्तांचे प्रतिनिधी  यांची उपस्थिती होती.
      या बैठकीस  *गंगापूर- खुलताबाद तालुक्याचे आमदार मा. श्री प्रशांतजी बंब साहेब सौ. अनुराधा चव्हाण सभापती महिला व बालकल्याण श्री. बापूसाहेब घडामोडी श्री. संजयजी खंबायते,* यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

     जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी महानगरपालिकेची महिला बाल कल्याण अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या कडील अहवालसह हजर होते.
     श्री. कराड, केंद्रीय राज्यमंत्री यांनी सर्व बँकांना सूचना दिल्या की *मा. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून* देशातील महिला सक्षम बनवणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, महिलांना आत्मनिर्भर बनवणे व आत्मनिर्भर भारताची संकल्पना विशद केली या संकल्पनेला मूर्त रूप देणे म्हणजेच शहरी व ग्रामीण भागातील महिला बचत गटांना उद्योगा करिता विनातारण तात्काळ कर्ज पुरवठा करणे.
    औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हा विकास यंत्रणा व महानगरपालिका यांच्याकडून बँकांकडे पाठवण्यात आलेले कर्ज प्रस्ताव विहित वेळेत निकाली काढण्यात यावे, खाते उघडण्या पासून ते कर्ज पुरवठा करणे पर्यंतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व ज्या काही त्रुटया असतील त्याची कारणमीमांसा देऊन त्या तात्काळ पूर्ण करण्यात यावे असे आदेशित केले.
    शहरांमध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने महिला बचत गटांची स्थापना प्रामुख्याने हाती घ्यावी व केंद्र शासन नाबार्डच्या सर्व योजनांची माहिती बचत गटांना करून देण्यात यावी बचत गटांना उद्योग सेवा उद्योग उभारण्यासाठी प्रामुख्याने कर्ज पुरवठा होतो प्रचार व प्रसिद्धी करावी असे महानगरपालिका व जिल्हा परिषद यांना आदेशित केले.
     आजच्या बैठकीच्या अनुषंगाने बँके कडील प्रलंबित असलेल्या बचत गटांच्या सर्व कर्ज प्रकरणांचा निपटारा करून वस्तुनिष्ठ अहवाल पुढील बैठकीत द्यावा व *पुढील बैठक फेब्रुवारी मध्ये घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांना यांना आदेशित केले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या