Advertisement

Responsive Advertisement

धर्माबाद मध्ये विविध ठिकाणी दर्पण दिन साजरा..

धर्माबाद - मराठी पत्रकारितेचा पाया रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सबंध महाराष्ट्र भरात दर्पण दिन साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर काल धर्माबाद शहरात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रथमदर्शनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रविंद्र पोतगंटीवर यांनी आपल्या निवासस्थानी तालुक्यातील सर्व पत्रकारांना आमंत्रित करून सर्वांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पत्रकारांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. तद्नंतर पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या वतीने पुष्प व लेखणी देऊन सर्व पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला तर शेवटच्या सत्रात  टिपू सुलतान ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्यावतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार सत्कार समारंभात संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष डॉ. जहिरुद्दिन पठाण सर, मराठवाडा सचिव नविद अहमद यांच्या ता.अध्यक्ष मिरझा खुरम बेग यांच्या संकल्पनेतून सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसाळे, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, कृष्णा तिम्मापुरे, गंगाधर धडेकर, माधव हणमंते, सुरेश घाळे, भगवान कांबळे, बाबुराव पाटील, सतीश शिंदे, किशन कांबळे, दत्तात्रय सज्जन, गंगाप्रसाद सोनकांबळे, किरण गजभारे, अहमद लड्डा, शेख जमाल, रहीम खान, अब्दुल रज्जाक, राहुल वाघमारे, नारायण सोनटक्के, साजिद सर, मतीन सर यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या