Advertisement

Responsive Advertisement

बजाजनगर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे मार्केट फलकाचे अनावरण

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद : स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस ममता दिन म्हणून साजरा केला जातो. ममता दिनाचे औचित्य साधत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते बजाजनगर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे मार्केट फलकाचे अनावरण झाले.
यावेळी शिवसेना शाखेच्या वतीने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात . यावेळी उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, हनुमान भोंडवे,  भटानकर, कैलास भोकरे, महिला आघाडीच्या छाया जाधव, मंदा भोकरे, कांता चव्हाण गायकवाड आदींसह स्थानिक पदाधिकारी व मार्केटमधील व्यापारी बंधू उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या