Advertisement

Responsive Advertisement

झरी फाटा ते वडगाव या रस्त्याचे काम निकृष्ट ?


खुलताबाद - तालुक्यातील व बाजार सावंगी सर्कल मधील झरी फाटा ते वडगाव या रस्त्याची दुरुस्ती व मजबुतीकरण मागील काही दिवसांपासून चालू आहे तरी ह्या कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणा  केल्या गेल्याने ग्रामस्थांनी केले होते काम बंद

ठेकेदाराच्या अतिशय निकृष्ट काम केल्याने ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की हे काम न केलेले बरे ठेकेदाराने अतिशय निष्कृष्ट अशे काम या रोडचे सुरू केलेले होते झरी फाटा ते वडगाव या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे आहेत व त्या खड्ड्यातली माती झाडून त्यात कोरडी खडे टाकून डांबर चा उपयोग न करता अतिशय निकृष्ट असे काम या रस्त्याचे चालू होते
व काही ठिकाणी खूप कमी डांबर चा वापर केल्या गेले होते व  ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे व्हावे व सार्वजनिक बांधकाम विभागातच्या अधिकाऱ्याने या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराकडून असे निष्कृष्ट काम होत आहे 

 रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद केल्यामुळे व ग्रामस्थांच्या काही तक्रारीमुळे या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंता विरारे यांच्या हस्ते करण्यात आली व त्यांनी सांगितले की रोडची जाडी कमी आहे व काम अतिशय निकृष्ट असे झालेले आहे
त्यांनी स्वतः रोड ची पाहणी केली
यावेळी उपस्थित झरी चे सरपंच  करण राजपूत व काही ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे या रस्त्याचे काम आता व्यवस्थितपणे चालू आहे तरीही मागील काही  दिवसांमध्ये झालेले काम चारशे ते पाचशे फूट अतिशय निष्कृष्टपाने झालेले आहे व त्या पुढील काम चांगल्या प्रकारे होत आहे अशी ग्रामस्थांची म्हणणे आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या