Advertisement

Responsive Advertisement

कंदकुर्तीच्या पुरातन राम मंदिरात धाडसी चोरी...


{चांदीचा टोपा सहित 13 अति प्राचीन मुर्त्या चोरीला}

धर्माबाद- धर्माबाद शहरापासून बारा किलोमीटरवर व महाराष्ट्र सीमेपासून गोदावरी नदीच्या पलीकडे अवघ्या फर्लांगभर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष हेडगेवार यांच्या जन्मगावी असलेल्या पुरातन राम मंदिरात काल रात्री धाडसी चोरी होऊन चार चांदीच्या मुकुटासह 13 अतिप्राचीन मुर्त्या चोरीला गेल्या.
चोरट्यांनी अतिशय सराईतपणे ही चोरी केली.
उपरोक्त राम मंदिर हे अतिशय पुरातन असून या मंदिराचा  जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिरामध्ये चारशे ते पाचशे वर्षे इतिहास असलेल्या विविध देवदेवतांच्या पंचधातूच्या तेरा मुर्त्या होत्या. काही मुर्त्या वर चांदीचा टोप होता. ज्याची किंमत एक दोन लाखाच्या वर होती. तर पंचधातुच्या असलेल्या अतिप्राचीन तेरा मुर्त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कोटीच्या घरात जाते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
 मंदिराचे आर्चक आनंद महाराज हे मराठी भाषिक आहेत. त्यांनी सकाळी मंदिर उघडल्यावर सदरील घटना लक्षात आली. त्या अनुषंगाने त्यांनी रेंजल मंडळ पोलिस ठाण्याला कळवल्या वरून पोलीस निरीक्षक एस राजाराम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिस्थितीचे सर्व अवलोकन करून सदरील चोरी करणारे अतिशय सराईत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त करीत धर्माबाद पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरील घटनेची माहिती देऊन शहराच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या रस्त्यावरील कुठे सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर ते तपासण्याची त्यांनी विनंती केली. सदरील घटना ही तेलंगाना महाराष्ट्र सीमेवर मोठी समजल्या जात असून चोरट्यांनी आता अति प्राचीन मंदिरातील अति प्राचीन मूर्त्यांना लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
                    प्रस्तुत प्रतिनिधीने थेट घटनास्थळावर जाऊन सर्वांच्या प्रतिक्रिया घेतल्या. कंदकुर्ती हे गाव प्राचीन इतिहास असलेले गाव असून या गावात अनेक मंदिरे वसली गेली आहेत. या मंदिरांना शेकडो वर्षांचा इतिहास असून प्रत्येक मंदिरात अतिशय प्राचीन मुर्त्या आहेत हे गाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेडगेवार यांचे जन्मगाव आहे. सदरील घटनेचा तपास लवकरच लावू असे रेंजलचे पोलीस निरीक्षक राजाराम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगत महाराष्ट्राच्या प्रसारमाध्यमांनी व पोलिसांनी सहकार्य करण्याची विनंती केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या