Advertisement

Responsive Advertisement

मी निष्ठा आणि प्रामाणिकपणा सोडला नाही; त्याचेच आज फळ मिळाले - डॉ भागवत कराडऔरंगाबाद: स्व. गोपीनाथ मुंडे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मला फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये उमेदवारी देऊ केली होती. त्यांच्या सूचनेवरून तीन वर्षांत मतदारसंघ पादाक्रांत केला, परंतु ऐनवेळी ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी मिळाली. मात्र मी निष्ठा आणि प्रामाणिकपणा कधी सोडला नाही. त्यामुळेच आज मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. अशी भावना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली.औरंगाबाद तालुक्यातील आडगाव (बु.) येथे भाजप जिल्हा ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष कैलास साळुबा ढाकणे आणि ग्रामस्थांनी रविवारी डॉ. कराड यांची लाडू तुला करून क्रेनने दोन क्विंटलचा हार घालून सत्कार केला. यावेळी कराड म्हणाले, औरंगाबाद मध्य विधानसभेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी मला दिली होती. परंतु ती नाकारत पक्षाच्या कामाला मी प्राधान्य दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून पक्षाचे काम केले. फुलंब्री मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतरही प्रामाणिकपणा आणि पक्षावरील निष्ठा कधी सोडली नाही. त्याचेच फळ आज मला मिळाले आहे. असेही यावेळी ते म्हणाले.यावेळी पंचायत समितीचे सदस्य कल्याण गायकवाड, अशोक पवार, गोपीनाथ वाघ आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास भाऊसाहेब नागरे, बाबुराव दसपते, रामदास ढाकणे आदींची उपस्थिती होती. डॉ. कराड यांनी मुद्रा लोन बाबत उपस्थितांना माहिती दिली. तरुणांनी मुद्रा लोन घेऊन व्यवसाय उभारावा असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी संघटनेसाठी डॉ. कराड यांनी रक्ताचे पाणी केल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. तर माजी महापूर भगवान घडामोडे यांनी कराड यांना विरोध करणारे सर्वप्रथम त्यांच्या गाडीत बसतात अशी मिश्किल टिप्पणी यावेळी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या