Advertisement

Responsive Advertisement

काँग्रेसच्या दनक्यानंतर महेमुद दरवाजाच्या दुरुस्तीला सुरूवात, स्मार्टसिटी निधीतून काम सुरु

औरंगाबाद -
ऐतिहासिक पनचक्की समोरील महेमुद दरवाजाची स्थिती खराब झाली आहे. याला तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर काँग्रेसच्या दनक्यानंतर स्मार्टसिटी निधीतून सोमवारी या गेटच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. याबद्दल शहरातील नागरिकांनी शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांचे आभार मानले आहे.
400 वर्षे जुने महेमुद दरवाजाची पडझड सुरु झाली तेव्हापासून त्यांच्या दुरुस्तीसाठी एप्रिल 2021 मध्ये प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे पत्रव्यवहार केला. 8 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांना पत्र देवून गेटच्या दुरुस्तीची मागणी केली. 29 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली. 1 जुलै रोजी पर्यटनमंत्री आदीत्य ठाकरे यांना पत्र पाठवले. यानंतर आणखी एक पत्र पाठवले त्यानंतर मंत्री महोदयांनी प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांना तात्काळ ऐतिहासिक गेटच्या दुरुस्तीचे आदेश दिले. अखेर स्मार्टसिटी निधीतून डागडुगी सुरु करण्यात आली. 38 लाख रुपये खर्च करुन नुतनीकरण व संवर्धन, सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. चार महीन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दोन तिनदा या कामासाठी स्मार्टसिटी प्रशासनाने निविदा काढली पण प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्यांदा प्रतिसाद मिळाल्याने ठेकेदाराने काम सुरू केले आहे. वाहतूकीसाठी हा रस्ता मागील काही महीन्यांपासून बंद आहे यामुळे पनचक्की बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.
जेव्हापासून त्यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा हातात घेतली शहराच्या विकासासाठी प्रमाणिक प्रयत्न ते करत आहे. शहरात काँग्रेस बळकट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्मातील नवीन कार्यकर्ते पक्षासोबत जोडले जात असल्याने पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामावर खुश आहे. घाटी रुग्णालयाचा रस्ता दुरुस्ती, गुंठेवारी, लेबल कॉलनी, शहरातील पाणी व रस्त्याच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाला घेरण्याचे काम त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या