Advertisement

Responsive Advertisement

जालना रोडवर २०० ऐवजी ४०० खाटाच्या झालेल्या रुग्णालयाच्या बांधकामाची खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केली पाहणी


संपुर्ण मराठवाड्यातील सर्वसामान्य रुग्णांना मिळणार दर्जेदार वैद्यकीय सुविधा
 
 औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी २०१३ साली घोषित झालेल्या २०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयास शहरात जागा उपलब्ध करुन बांधकाम करण्यात यावे याकरिता मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने जालना रोडवर जागा उपलब्ध होवून खासदार इम्तियाज जलील यांच्या यशस्वी पाठपुराव्यांमुळे निधीची मान्यता सुध्दा मिळाली आहे. सद्यस्थितीत आज जालना रोडवर २०० ऐवजी ४०० खाटाच्या भव्य रुग्णालयाचे बांधकाम युध्दस्तरावर सुरु आहे.
           आज खासदार इम्तियाज जलील यांनी ४०० खाटाच्या रुग्णालयाच्या प्रगतीपथावरील बांधकामाची पाहणी करुन कार्यारंभ आदेशात नमुद केल्याप्रमाणे विहीत वेळेत गुणवत्तापुर्ण, दर्जात्मक व दोषमुक्त बांधकाम पुर्ण करण्याचे सुचना उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
           पाहणी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामाची संपुर्ण माहिती देवुन सद्यस्थितीत रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे फुटींगचे काम व पापार्किंग लेव्हल वरील पुर्ण झालेल्या बीम कामाची तांत्रिक माहिती दिली.
          उपमुख्य वास्तुविशारद एस.व्ही. गेडामे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना ४०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालय व त्यावरील एम.सी.एच. रुग्णालयाची सविस्तर तांत्रिक माहिती देवुन ३० महिण्यांच्या कालावधीत बांधकाम पुर्ण होणार असल्याचे कळविले.  
          चार मजली रुग्णालयाचे मुख्य इमारत बेसमेंन्ट पार्किंग, वरिष्ठ तळ व चार मजले असे स्वरुप असणार आहे यामध्ये पार्किंग एरिया, स्वच्छता गृह, वॉशिंग, स्टोर / रेकॉर्ड, सुरक्षा केबिन, मेडिसिन स्टोर, रेकार्डरुम, ओ.पी.डी., फॅमिली प्लांनिंग रुम, एक्स-रे रेडिओलोजिस्ट, स्टेशनरी रुम, एस.एस.एस.डी रुम, हिस्टोलोजी – साप्टोलोजी लॅब, सोनोग्राफी – ईसीजी रुम्स, पेडियाट्रिक्स, नर्सिंग-न्युट्रिश्न, एस-इंटिंग्रेशन, एक्सामिनेशन, पेडियाट्रिक्स वार्डख् ओ.टी.ब्लॉक, मेडिसिन व ईक्विपमेंट स्टोर, लोबी-ए.एन.सी वार्ड, शस्त्रक्रिया विभाग, विविध चाचण्यांचे लॅब, विविध वैद्यकीय तांत्रिक विभाग तसेच प्रशासकीय व वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालयाची सविस्तर तांत्रिक माहिती उपमुख्य वास्तुविशारद एस.व्ही. गेडामे व इतर संबंधित अधिकारी यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिली.
          सबब रुग्णालयासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार असतांना विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता तसेच शासनाच्या विविध स्तरावर यशस्वी पाठपुरावा करुन रुग्णालय तात्काळ बांधण्यासाठी मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. इम्तियाज जलील विरुध्द महाराष्ट्र शासन याचिकेच्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमुद केले आहे की, रुग्णालयाचे संपुर्ण नविन बांधकाम हे सर्व सोयीसुविधासह मा.उच्च न्यायालयाच्या निगराणीत होणार आहे.
          यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक बडे, कार्यकारी अभियंता एन.व्ही. भांडे, उपअभियंता एस.डी. महेश्वर, शाखा अभियंता आर.एस. बेले, एम.एम. आझमी, वास्तुविशारद ए.ए. वाघवसे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या