Advertisement

Responsive Advertisement

ऑनलाईनच्या जमान्यात मैदानी खेळ टिकले पाहिजे - शिवसेना नेते चंद्रकांत खैरेस्व. माजी आमदार आर.एम. वाणी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देवा ग्रुप विजेता

औरंगाबाद : आजकाल नवीन पिढीला मोबाइल व ऑनलाईनचे व्यसन लागेल आहे. आधुनिक व्हा, मात्र आपल्या परंपरा व शारीरिक व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी खेळ अनिवार्य करावे लागत आहे. सर्वच गोष्टी ऑनलाईन व घरबसल्या होत नाही. त्यामुळे दीर्घायुष्य व मजबूतीसाठीऑनलाईनच्या जमान्यात मैदानी खेळ टिकले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. स्व. वैजापूर येथे माजी आमदार आर.एम. वाणी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देवा ग्रुप विजेत्यानां बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
 वैजापूर तालुक्यात  शिवसेना, युवासेनेच्या वतीने आयोजित स्व. माजी आमदार आर. एम.वाणी क्रीडा चषकाच्या फायनलमध्ये देवा ग्रुप क्रिकेट संघाने पोलीस क्रिकेट संघावर मात करून विजेतेपद पटकाविले. चषकासह १ लाख ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या हस्ते स्वीकारले. द्वितीय पारितोषिक पोलीस क्रिकेट संघाने पटकावले. त्यांनी १ लाख १ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले.
रविवारी झालेल्या सेमी फायनल व फायनलमध्ये चुरशीची लढत बघावयास मिळाली. प्रथम बक्षीस देवा ग्रुप क्रिकेट संघ १ लाख ५१ हजार ( शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातर्फ़े व द्वितीय बक्षीस पोलीस क्रिकेट संघ १ लाख १ हजार यांना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यातर्फे देण्यात आले. तर तृतीय बक्षीस परदेशी क्रिकेट संघ ७१ हजार रुपये आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्यातर्फे तर चौथे बक्षीस गोल्डन क्रिकेट संघ ५१ हजार रुपये, उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्यावतीने देण्यात आले. तसेच मॅन ऑफ द मॅच दिलीप बिडवा, बाळू हिवाळे, बेस्ट बॉलर अनिल न्हावले, बेस्ट बॅटस्मन विश्वा राजपूत, मॅन ऑफ द सीरीज कृष्णा पवार, बेस्ट समालोचक अलंकार बानखेळे, बेस्ट फिल्डर श्रीकांत शिंदे, हॅट्ट्रिक मिलिंद बिडवा, पहिले अर्धशतक सुनील खर्डे व बेस्ट कीपर म्हणून योगेश पवार यांना टीव्ही, सायकल, रोख रक्कम व शिल्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. 
यावेळी उपनगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपजिल्हाप्रमुख आंनद तांदुळवाडीकर, जि.प. सभापती अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, माजी सभापती संजय निकम, शहरप्रमुख राजेंद्र साळुंके, न. प. गटनेते प्रकाश चव्हाण, नगरसेवक पारस घाटे, सखाहारी बर्डे, बिलाल सौदागर, लिमेश वाणी, डॉ.परेश भोपळे, डॉ.नीलेश भाटिया, स्वप्निल जेजूरकर, शेख रियाज, इम्रान कुरेशी, देवीदास वाणी, उपतालुका प्रमुख महेश बनगे, सलीम वैजापुरी, उमेश शिंदे, संदीप बोर्डे, सजन गायकवाड आयोजन समितीचे सुलतान खान, अमीर अली, अमोल बोरनारे, सुकदेव गायकवाड, श्रीराम गायकवाड, राहुल बागले, अनिल न्हावले , कमलेश अंबेकर, संकेत वाणी, श्रीकांत साळंके, निखिल वाणी आदीसह जिल्हाभरातून आलेले क्रिकेट प्रेमी नागरिक उपस्थित होते.

https://www.facebook.com/677896992279070/posts/4553442401391157/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या