Advertisement

Responsive Advertisement

ठाकरे सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आमदार अंबादास दानवे यांचे शिवसैनिकांना आवाहन

औरंगाबाद-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनाला साद देत शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजीत शिव संवाद मोहिम दोन दिवसापासून वैजापूर तालुक्यातील विविध गावात सुरू आहे. या शिव संवाद मोहिमेच्या झंझावातामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आज वैजापूर तालुक्यातील वाघला, संजरपुरवाडी या गावात बैठक घेऊन स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, नागरिक यांच्याशी गावातील विकास कामाविषयी माहिती जाणून घेतली.
 *यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी मागील दोन वर्षाच्या काळात ठाकरे सरकारच्या माध्यमातून झालेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रत्येक शिवसैनिकांनी करावे असे आवाहन केले*
याप्रसंगी बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप,तालुकाप्रमुख सचिन वाणी,जि.प.सदस्य रामहरी बापु, जि. प. सदस्य मानाजी मिसाळ उपतालुकाप्रमुख गोरख आहेर पंढरीनाथ कदम, महिला आघाडी तालुका संघटक वर्षा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

*त्याचप्रमाणे वाघला याठिकाणी* गोकुळ आहेर,विभागप्रमुख प्रभाकर जाधव, अरुण शेलार युवा सेना उपतालुका अधिकारी विठ्ठल डमाळे,बाळु बडक,बाबासाहेब राऊत, सुदाम गोरे पिंटू भाऊ तुपे सतीश ठोंबरे बाबासाहेब वारेकर योगेश गोरे साबीर शेख कैलास कदम संतोष साळुंखे कल्याण बोडके संजय पवार संतोष दवंगे विशाल सरोवर शाकीर शेख माणिक जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. 
*त्याचप्रमाणे संजरपूरवाडी या ठिकाणी* उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ कदम, उपविभागप्रमुख प्रवीण सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाघ, उपविभाग प्रमुख संभाजी डुकरे, सरपंच राजू जारवाल, किशोर हुमे, संभाजी जगताप ,बंटी निघोटे, बळीराम तांबे, गुलचंद राजपूत, मानक ढंगारे, ऊद्दल राजपूत आदी शिवसैनिक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या