Advertisement

Responsive Advertisement

सार्वजनिक ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्ववत करा. - मनसे.


धर्माबाद :- नागरिकांकडून करवसुली होत नसल्याचे कारण पुढे करत धर्माबाद नगर परिषदेने आडमुठी भूमिका घेत सार्वजनिक ठिकाणचे बोअरवेल्स, पाण्याच्या टाक्यांचे कनेक्शन बंद केले असून सदरील पाणीपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाकरोड यांनी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
        ऐन सणासुदीच्या तोंडावर धर्माबाद नगरबोरिषदेने शहरातील सार्वजनिक ठिकाणी तथा रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाक्यांचा वीजपुरवठा नगर परिषदेने खंडित केला आहे.त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गत दोन तीन वर्षात कोरोनाने बेजार झालेल्या नागरिकांकडून सक्तीची का होईना पण करवसुली पालिका प्रशासनाने करून घेतली आहे. कर शहरातील नळधारक नियमितपणे कराचा भरणा करत नसल्याने वेळेत करवसुली होत नाही म्हणून करवसुलीसाठी नगर परिषदेने हा पर्याय निवडल्याचे समजते. परिणामी याचा त्रास सर्वसामान्य जनेतेलाच होत असून लवकरात लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करावा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या