Advertisement

Responsive Advertisement

भाजपशी हातमिळवणी डॉ कल्याण काळेंच्या अंगलट; काॅंग्रेसमध्ये भडका..औरंगाबाद : राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी संघर्ष करत आहेत. तर दुसरीडे स्थानिक पातळीवर मात्र सहकाराच्या नावाखाळी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे करत आहेत.  भाजपच्या  मांडीला लावून बसत आहेत, प्रचार करत आहेत. मग यातून कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यावा,जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काॅंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी केली आहे.या संदर्भात लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे कार्यकर्त्यांचे म्हणणे मांडणार असल्याचेही औताडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा सहकारी दुध संघाची निवडणूक सुरु आहे. याच निवडणूकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आले असून एकता सहकार पॅनलच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.रविवारी फुलंब्री येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पारंपारिक विरोधाक आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे एकाच मंचावर होते. यावर आक्षेप घेत सेवादलातर्फे पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त करण्यात आली.विलास औताडे म्हणाले, या निवडणूकीत सर्वपक्षीय एकता पॅनलच्या प्रचार पत्रकात माझा फोटो छापून आला. या निवडणूकीच्या प्रक्रियेत मी नव्हतो. कोणासोबत आघाडी झाली, हे मला महित नाही. असे असताना माझा कुठलाही संबंध नसताना खोडसाळपणे व राजकीयदृष्ट्या सेवा दलाची बदनामी करण्याच्या उद्दिष्टाने माझा फोटो छापण्यात आल्या.फुलंब्री येथील बैठकीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार आणि कार्यकर्त्यांचे मला फोन आले. कार्यकर्ते संभ्रमात होते. त्या बैठकीत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डाँ. काळे यानी हजेरी लावत एकता पॅनलला मतदान करा, असे आव्हान केले आहे. यात भाजपची मंडळी असल्यानेच कार्यकर्त्यांना प्रश्‍न पडला की आता काय करावे.देशपातळीपासून ते अगदी गावस्तरावर भाजपला काॅंग्रेसचा विरोध आहे, मग जिल्हाध्यक्षच जर भाजपचा प्रचार करत असतील तर मग काय बोलावे. जिल्हाध्यक्ष काळे यांनी यासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट करावी, असेही औताडे म्हणाले. दुध संघाच्या निवडणूकी संदर्भात जिल्हाध्यक्षांनी काँग्रेची बैठक बोलवली नाही. जिल्ह्यातील एकाही पदाधिकारी, कार्यकर्त्याशी चर्चा न करता आता भाजपच्या प्रचारात उतरले. त्यांच्यासोबत काही तालुकाध्यक्ष आहेत.काँग्रेस भाजपसोबत कशी जाऊ शकते. भाजपच्या स्टेजवर गेल्यामूळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याचा परिणाम हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकावर होऊ नये यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेत असल्याचे औताडे यांनी सांगितले. औरंगाबाद पंचायत समितीचे गटनेते अनुराग शिंदे यांनी ही काळे यांच्यावर हल्ला चढवत डॉ. कल्याण काळे यांनी भाजपशी हातमिळवणी करत काँग्रेसचा विश्‍वासघात केल्याचा आरोप केला.पंचायत समितीतही काँग्रेसच्या हाती येणारे उपसभापती पद काळे यांच्यामुळेच हुकले. काळे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे की, भाजपचे? असा सवालही शिंदे यांनी केला. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी घर भरायचेच काम केले. जिल्हा बँकेत भावाला आणि साल्याला उमेदवारी दिली. प्रमाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीतीतून अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येते. पक्षश्रेष्ठींनी याचा गांभीर्याने विचार करुन नवीन व तरुणाकडे जिल्हाध्यक्ष पद सोपवावे, अशी मागणी देखील शिंदे यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या