Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबादेत करुणा मुंडेंच्या शिवशक्ती सेनेला नाकारली परवानगी ?


औरंगाबाद: गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात करुणा मुंडे हे नाव मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या त्या पत्नी आहेत. धनंजय मुंडे सोबत बंड करून त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवशक्ती सेना हा नवा पक्ष स्थापन केला आहे. मोठ्या प्रमाणावर या पक्षाचे काम त्यांनी सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात या नव्या पक्षाची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. बैठक घेतल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव याठिकाणी या करुणा मुंडेंच्या पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून त्या मार्गदर्शन करणार होते. लवकरच शिवशक्ती पक्षाचा मोठा मेळावा आयोजित करण्यात असल्याची घोषणा मुंडे यांनी केली होती. या मेळाव्यासंबंधातच ही बैठक असल्याचे बोलले जात होते. मात्र औरंगाबाद पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही करुणा मुंडे औरंगाबाद शहरात येणार आहेत. अशी माहिती शिव शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील संबंध समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.करुणा शर्मा धनंजय मुंडेची दुसरी पत्नी असल्याचे बोलले जाते. सोशल माध्यमातून धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यासोबतचे संबंध आणि ही गोष्ट कुटुंबियांना माहिती असल्याचे कबूल केले होते. याआधी करूणा मुंडे समाजकारणात सक्रिय होत्या. मात्र धनंजय मुंडेंशी असलेले संबंध जगजाहीर झाल्यानंतर त्यांनी राजकारणात आपले पाऊल ठेवले आहे. त्यांनी सुरू केलेल्या शिव शक्ती सेना या पक्षाचा लवकरच मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. सध्या त्या राजकारणात सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या