Advertisement

Responsive Advertisement

बाजार सावंगी ते कन्नड मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्पखुलताबाद - तालुक्यातील   बाजारसावंगी - जैतखेडा मुख्य रस्त्यावर सावंगी शेखपूर शिवार मधे मोठ्या टाॅवर लाईन वरील तारी अडकून असलेली लोखंडी क्लेम तुटल्याने टाॅवर वरील तारी रस्त्यावर दि. १५ सकाळी पडली असुण ये-जा करणारी वाहतुक मोठी वाहने बंद पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात दुचाकी धारक आपले जीव धोक्यात घालून तयारीच्या खालुन वाकून शेतातून रस्ता काढत ये - जा करत आहे. मोठय़ा टाॅवरची मोठी तारी पडून त्याच्या लगत शिवारातील छोटी शेती लगतच्या खांब लाईन तारी वर पडून वीजमहावितरण कंपनीचे चारपाच खांबावरील तारी खांब पडून नुकसान झाले आहे. मात्र जीवीत हानी झाली नाही. या संदर्भात मोठी टाॅवर लाईन विभागाला याची सुचना देण्यात आली आहे. ही घटना दुसर्‍यांदा झाली आहे. ही घटना या लाईनवर वेळोवेळी का घडत आहे. निकृष्ट मटेरियल तर याचे कारण नाही. काम सुरु असताना याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करतात व याचा फटका व त्रास सर्वसामान्यांना सहन करावे लागते विभागाने कामाचा दर्जा मटेरियल याची चौकशी करून कारवाई करावी असी मागणी अनेक नागरिकांनी प्रतिनिधी सी बोलताना सांगितले. तरी या रस्त्यावर आज येता जाताना काळजी घ्यावी. जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या