Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद टी प्वाँइंट येथे शहीद जवान अमोल पाटील यांच्या पार्थीवावर फुले उधळून श्रद्धांजली.


औरंगाबाद - जिल्ह्यातील येथिल दौलताबाद पोलीस चौकीवर सकाळी ८ वाजता  बोलठाण येथिल शहीद जवान अमोल पाटील यांच्या पार्थिवावर फूले अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नेपाळ सीमेवर संक्रांतीच्या दिवशी या जवानाला वीर मरण आले होते.त्यांचे पार्थिव आज सकाळच्या विमानाने औरंगाबाद विमानतळावर आण्यात आले होते.म्हनून औरंगाबाद - मालेगाव महामार्गाहून या जवानाचे पार्थिव सैन्य दलाच्या शासकीय वाहनाने बोलठाण येथे घेवून जात असतांना याची माहीती येथिल नागरीकांना मिळाली त्यावेळी दौलताबाद टी प्वाँइंट येथे देशप्रेमी नागरीक एकत्र येत  याची तात्काळ दखल घेवून मिटमिटा येथिल भारत अँकँडमी सैन्यदलभरती प्रशिक्षणार्थि विद्यार्थी  यांच्या आणि शरणापूर ग्रामपंचायत यांच्या वतिने  सोमनाथ कान्हेरे ,भारत अँकडमीचे बाळासाहेब घूगे,प्रा.शिवाजी गायकवाड ,आण्णासाहेब खजिणदार,माजी सैनिक अशोक हांगे,के.बी.पवार,कारभारी कान्हेरे,माजी सैनिक समाधान सूरडकर,आमोल कवडे,विलास होसारे,आण्णा चव्हाण,शेकु वाघ , आदिंच्या प्रमूख उपस्थितीत मोठ्या जयघोषात पार्थिव येताच भारतमाता की जय,अमर रहे अमर रहे अमोल पाटील अमर रहे च्या घोषणां देत ,फूलेउधळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आसंमतात घोषणा व साश्रु नयनांनी आश्रुंना वाट करत परीसर दूमदूमून गेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या