Advertisement

Responsive Advertisement

बोलठाण येथील जवान आमोल पाटिल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

प्रतीनीधी शांताराम मगर 

वैजापूर - बोलठाण येथील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण  आल्याची दुःखद घटना समोर आली आहे. कर्तव्यावर असताना उच्चदाब प्रवाहाचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने तिघा सैनिकांची प्राणज्योत मालवली. यापैकी अमोल हिंमतराव पाटील या 30 वर्षीय जवानाचं नाव आहे. ते नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील रहिवासी होते. बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई,भाऊ असा परिवार आहे. अमोल पाटील यांच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
अमोल यांच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली.या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले.प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.
सशस्त्र सीमाबलाच्या बिहार-नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत असलेले बोलठाण येणार जवान अमोल पाटील सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होते. ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेले असतानाही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अमोल यांची सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती.
*चिमुकलीच्या जन्माचा आनंद*
दिवाळीत अमोल पाटील बोलठाणमधील आपल्या गावी सुट्टीवर आले होते. मुलगी झाल्याचा आनंदही त्यांनी गावात साजरा केला होता. जाताना आई, पत्नी आणि आपल्या चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपलेल्या अमोल यांच्या पश्चात पत्नी,राजश्री सहा महिन्यांची मुलगी,आदिती आई निर्मलाबाई भाऊ रोषण असा परिवार आहे.
अमोल पाटील यांचे पार्थिव बोलठाण येथे येताच भारतमाता की जय,अमर रहे अमर रहे अमोल पाटील अमर रहे च्या घोषणां देत ,फूलेउधळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आसंमतात घोषणा व साश्रु नयनांनी आश्रुंना वाट करत परीसर दूमदूमून गेला होता.अमोल पाटील त्यांच्या पार्थिवावर बोलठाण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस आमदार सुहास कादे आमदार रमेश बोरणारे माजी आमदार आनिल आहेर मा आ.संजय पवार सभापती भागीनाथ मगर आनिल रिढे रफीक पढाण सुनिल निकम याच्यासह परीसरातील सर्वच क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या