Advertisement

Responsive Advertisement

मुस्लिम महिलांवरील अन्यायाविरोधात केंद्र सरकारला शांत का बसले आहे? अॅड. आस्मा शेख


औरंगाबाद: एकीकडे केंद्र सरकार ट्रिपल तलाकच्या मुद्यावरुन मुस्लिम महिलांबाबत सहानुभूती दाखवत आहे तर दुसरीकडे त्यांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या सुली डिल्स अॅप तयार करणाऱ्यांबाबत एकही शब्द बोलत नाही. तसेच त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. ज्या देशात देवी म्हणून महिलांची पूजा केली जाते त्याच देशात महिलांना अशी वागणूक दिली जात आहे. मुस्लिम महिलांवरील अन्यायाविरोधात केंद्र सरकारला शांत का बसले आहे? असा सवाल अॅड. आस्मा शेख यांनी औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांबाबत सुली डील्स ॲपद्वारे त्यांचे सोशल मीडियावरील फोटो टाकून त्यांचा सौदा करण्यासाठीचा आवाहन करण्यात आले. हा विकृत प्रकार नुकताच घडला आहे. यामागे असलेल्या अजित भारती या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. द पॉलिटिक्स चे एडिटर आणि को-फाऊंडर अजित भारती यांनी सुली डिल्स अॅपबाबत स्वतःच्या ट्विटरवरुन माहिती देत मी स्वतः हे अॅप वापरत आहे तुम्ही देखील वापरा अशाप्रकारचे कॅप्शन देत लिंक शेअर केली होती.या अॅपमध्ये मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचे फोटो टाकण्यात आले होते. यामध्ये या महिलांची सौदेबाजी तसेच ऑनलाइन विक्रीचे ऑप्शन देखील ठेवण्यात आले होते. याबाबत औरंगाबाद येथे अॅड. आत्मा शेख यांनी विशेष पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये या मास्टरमाईंडला अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याबाबत जुलै २०२१ मध्ये यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या