Advertisement

Responsive Advertisement

शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लसीकरण पूर्ण करावे - आमदार विक्रम काळे


  फुलंब्री -  स. भु. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय वडोद बाजार ता. फुलंब्री जि. औरंगाबाद प्रशालेत मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आ. श्री. विक्रमजी काळे साहेब यांनी प्रशालेला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी प्रशालेतील शिक्षकांच्या विविध प्रकारच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. तसेच शासन पातळीवर शिक्षकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासित केले. तसेच लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  ग्रंथालयासाठी पंचवीस हजाराची पुस्तक देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.या प्रसंगी प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री दडमल सर. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप विखे, राष्ट्रवादी शिक्षक संघ फुलंब्री तालुकाध्यक्ष श्री. पाचपुते शामकांत , राष्ट्रवादी चे श्री भास्करजी कोलते,   श्री लहाने सर, श्री. तम्मेवार सर, प्रा. बंडु सोमवंशी सर, श्री. गोसावी सर, सकाळ चे पत्रकार श्री. बाबासाहेब ठोंबरे, श्री योगेश तांबट हजर होते.प्रशालेचे प्राचार्य श्री.  दडमल सर यांनी *सन्माननीय आ. विक्रमजी काळे साहेब यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.* प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. सुभाष रामकोर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार श्री पाचपुते यांनी मानले. याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षकवृंद,  तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या