Advertisement

Responsive Advertisement

ह.भ.प.अनिता महाराज पवार यांना आदर्श युवा युवा पुरस्कार जाहीर

औरंगाबाद-  पुणे येथील सुप्रसिद्ध असणारे अपेक्षा मासिक पुणे यांच्याकडून दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक आणि प्रबोधनपर  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आदर्श युवा पुरस्कार देऊन गुणगौरव केला जातो या वर्षी संभाजीनगर येथील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार, कीर्तनकार ह.भ.प.  अनिता महाराज पवार यांना जाहीर झाला आहे.त्या अतिशय दुर्लक्षित असणाऱ्या भिल्ल समाजातील महिला असून पारंपरिक अनिष्ट रूढी आणि परंपरा यांना फाटा देऊन समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.त्या उच्च शिक्षीत असुन  त्यांना अध्यात्माचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. भजन ,संतसगत व कीर्तनाची परंपरा  त्यांना लाभली आहे आणि तीच परंपरा पुढे चालवत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत असतानाच छत्रपती शिवराय ,राजमाता जिजाऊ  यांच्या विचारांचा प्रचार प्रसारही त्या करत ,समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य करून तरुनांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात त्.यांनी अतिशय दुर्लक्षित असणाऱ्या समाजात असतानादेखील समाजामध्ये अध्यात्माच्या आवड निर्माण व्हावी आणि प्रचार आणि प्रसार निर्माण व्हावा म्हणून भजन कीर्तन प्रवचन गायन तसेच भागवत कथा ह्या माध्यमातून अध्यात्मा बरोबर प्रबोधनाची सांगड घालत अविरतपणे त्या कार्यरत आहेत त्यांच्याया  कार्याची दखल घेऊन अपेक्षा मासिक पुणे यांच्या मार्फत त्यांचा दिनांक 15 जानेवारी रोजी पुणे येथे युवा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या