Advertisement

Responsive Advertisement

वीटभट्टी कामगार महिलांची आरोग्य व नेत्र तपासणी


दौलताबाद - 

लायन्स क्लब औरंगाबाद व दौलताबाद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांत सणानिमित्त अब्दीमंडी व दौलताबाद येथे वीट भट्टिवर काम करणाऱ्या मजूर महिलांची नेत्र  मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली       सर्व महिलांचे औक्षण करून हळद कुंकु करून वाण म्हणून सुरक्षेसाठी हात मौजे, सैनटाइझर,मास्क वाटप करण्यात आले पहिल्यांदाच वीट भट्टिवर काम करणाऱ्या मजूर महिलांची अश्या पद्धत्तिने आरोग्य तपासणी करण्यात आली आहे।           या उपकर्माचे सर्वत्र कौतुक केले जात आहे 
पोलिस निरीक्षक राजश्री आड़े यांनी कामगार महिलांचे  हळद कुंकु लाऊन त्यांच्याशी संवाद साधला व काही समस्या असल्यास निसंकोच मांडण्याचे आव्हान केले जर कोनी त्रास देत असेल अथवा छेडछाड केली तर कधीही मला फोन करा तुम्हाला तत्पर मदत उपलब्ध करून दिली जाईल 
या वेळी पोलिस निरीक्षक राजश्री आड़े,लायन्स क्लब औरंगाबाद रॉयल अध्यक्ष गणेश जाधव,मनोज बोरा (मामाजी),पारस ओत्सवल,हर्षदी अग्रवाल,सचिन ओत्सवल,पोलिस कर्मचारी नीलेश पाटिल,परमेश्व पालोदे,भरतसिंग धुमाले,रमेश गिरी,महेश घुगे,शेख राजू आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या