Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद रेल्वेस्थानकावर वाढवल्या कोरोना चाचण्या


औरंगाबाद :कोरोनाचा प्रतिदिन येणाऱ्या रुग्णांचा आकडा हा वाढतच चालला आहे. प्रतिदिन येणाऱ्या रुग्णांचा आकडा आता पाचशेच्या जवळ पोहचला असल्याने चिंता आणखी वाढतांना दिसत आहे. त्यामुळे आता सतर्कता म्हणून रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या तपासण्या वाढविल्या आहेत. तपासणी पथकाच्या टीममध्ये वाढ करण्यात आली आहे. चार तपासणी पथक वाढविले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.कोरोनाने आता पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यातल्या त्यात सर्वत्र सुरक्षा म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्क लावावा असे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातच रेल्वेने प्रतिदिन जाणाऱ्या प्रवाशी संख्या लक्षात घेता कोरोनाची तपासणी रेल्वे स्थानकावर केली जात आहे. आतापर्यंत दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी रेल्वे स्थानकावर केली जात होती. परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता इतर ठिकाणहुन येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या केल्या जात आहे. प्रतिदिन कोरोनाचा आकडा वाढत असल्याने सतर्कता म्हणून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी रेल्वे स्थानक येथे तपासणी पथकाची संख्या वाढविली आहे.कोरोनाची लस घेणे बंधनकारक असतानाही काहीजण अजूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानक परिसरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. एकही लस न घेतलेल्या प्रवाशांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्या तपासणीत कोरोनाचे रुग्ण देखील समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय लस घ्यावी, सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या