Advertisement

Responsive Advertisement

उज्वला योजनेच्या नावाखाली देशातील महिलांची मोदी सरकारने फसवणूक केली; महिला काँग्रेसचा केंद्रावर आरोप


औरंगाबाद : केंद्रातल्या मोदी सरकारने देशातील सगळ्या महिलांची फसवणूक केली आहे निवडणुकांच्या काळात उज्वला गॅस योजनेचे लॉलीपॉप त्यावेळी दाखवण्यात आले. सरकारने फक्त आश्वासनांची खैरात आणि गाजर दाखवले. काँग्रेस सरकारच्या काळात दुर्बल घटकांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या होत्या. महिलांना त्यावेळी न्याय मिळाला. मात्र आता केंद्र सरकारने सबसिडी काढून घेतल्यामुळे गॅस महागला आहे. आणि सामान्य महिलांचे बजेटही कोलमडले आहे. अशी टीका महिला काँग्रेस आघाडी तर्फे करण्यात आली.मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण आणि शहरातील गरीब महिलांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन दिले. मात्र आता सात वर्षांपूर्वी मिळत असणारी सबसिडी हळूहळू बंद केली. तसेच प्रचंड प्रमाणात महागाई वाढली. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस महिला आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आली. मोदी सरकार हाय हाय, महंगाई कि मार या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. केंद्रात भाजपाची सत्ता येऊन २०१४ मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. ते सत्तेत आल्यानंतर ग्रामीण भागातील महिला शेतातील गोळा करून काम आटोपल्यवर लाकूड गोळा करून चुलीवर स्वयंपाक करायच्या.त्यांची ही अडचण लक्षात घेऊन केंद्राने महिलांना उज्वला गॅस योजना सुरू केली. २०१४ मध्ये ४५० रुपयांला गॅस सिलेंडर मिळत होते. त्यावर सरकार सबसिडीही देत होते. पण केंद्र सरकारने गॅसवर देण्यात येणारी सबसिडी आता पूर्णपणे बंद केली. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९५० रुपयांवर गेली आहे. महिलांना गॅस विकत घेणे परवडण्यासारखे नाही त्यामुळे महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायला लागल्या आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा हेमलता पाटील, शहराध्यक्ष अंजली वडजे, प्रदेश सचिव सरोज मसलगे पाटील आदींनी जोरदार निदर्शने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या