Advertisement

Responsive Advertisement

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळयांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 
            पुणे, दि. 5 : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
            शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिवंगत सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही दिवंगत सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
            पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.
            दिवंगत सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या